खेड (प्रतिनिधी)
ज्ञानदीप शिक्षण प्रसारक मंडळ खेड रत्नागिरी संचलित ज्ञानदीप इंग्लिश मीडियम स्कूल (सी.बी.एस.ई) मोरवंडे- बोरज येथे दिनांक १५ जुलै २०२५ या दिवशी एम. ई .एस. आयुर्वेद महाविद्यालय, लोटे. यांच्यातर्फे किशोरवयीन मुलींसाठी मार्गदर्शनपर शिबिर आयोजित करण्यात आले होते.
सर्वप्रथम ज्ञानदीप इंग्लिश मीडियम स्कूलचे प्राचार्य श्री. भरत मोरे यांनी उपस्थित मा. शिबिर प्रमुख डॉ. मुग्धा बेलवलकर व इतर डॉक्टर सहचारी यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. या शिबिरामध्ये इयत्ता सातवी ते इयत्ता बारावी या विद्यार्थिनींनी सहभाग घेतला होता.
या शिबिरामध्ये डॉ. मुग्धा यांनी विद्यार्थिनींना मासिक पाळी, वयोगटानुसार शरीरात होणारे शारीरिक व मानसिक बदल, मासिक पाळी मध्ये घ्यावयाची काळजी व स्वच्छ्ता याची महत्त्वपूर्ण माहिती दिली तसेच योग्य तो संतुलित आहार व व्यायाम याचेही महत्त्व पटवून दिले.
या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रशालेचे प्राचार्य श्री. भरत मोरे, हेल्थकेअर टेकर सौ.शितल भोसले, सर्व वर्गांचे वर्गशिक्षक तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचे मोलाचे सहकार्य लाभले.













