दापोली, १८ जुलै :
महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री मा.ना. अजितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त तसेच राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष खासदार श्री. सुनिल तटकरे, महिला व बालकल्याण मंत्री अदिती तटकरे यांच्या नेतृत्वाखाली आणि महिला प्रदेशाध्यक्षा सौ. रुपाली चाकणकर यांच्या सूचनेनुसार “सक्षम तू” सप्ताह राबविण्यात आला.
या उपक्रमांतर्गत हर्णे येथील एन.डी. गोळे हायस्कूल येथे विद्यार्थ्यांना विविध कायदेविषयक बाबींबाबत मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी दापोली पोलीस निरीक्षक सौ. पूजा हिरेमठ यांनी पोक्सो अॅक्ट, सायबर गुन्हे, टोल फ्री क्रमांक आणि मुलींच्या सुरक्षिततेविषयी मुला-मुलींना समर्पक माहिती दिली. त्यांना सौ. साक्षी गुजर मॅडम यांचेही मोलाचे सहकार्य लाभले. या सत्रात दामिनी पथक व बीट मार्शल यांचाही सहभाग होता.
या कार्यक्रमासाठी शाळेचे मुख्याध्यापक प्रशांत गुरव, महिला प्रदेश सरचिटणीस सौ. रमाताई बेलोसे, महिला जिल्हा सरचिटणीस सौ. प्रीती जैन, हर्णे महिला अध्यक्षा सौ. शेहनाज मेमन, सौ. भाग्यश्री फसाळकर, वैदेही महाडिक यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. यावेळी सौ. हिरेमठ मॅडम यांच्या हस्ते शाळेला संविधानाची फ्रेम भेट देण्यात आली.
शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री. सुधीर राणे, उर्दू शाळा केंद्रप्रमुख श्री. ऐनरकर सर, सर्व शिक्षक, ग्रामपंचायत सदस्य, पालक वर्ग आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थित महिलांनी राष्ट्रवादी महिला आघाडीच्या या उपक्रमाचे विशेष आभार मानले.










