अंमली पदार्थ कोणी विक्री करत असेल तर त्याची माहिती द्या –अनिल व्हटकर

आचरा येथे व्यसनमुक्ती जागृती फेरीला उत्स्फुर्त प्रतिसाद

आचरा–अर्जुन बापर्डेकर : अंमली पदार्थांच्या सेवनाने आपल्या शरीराची किती हानी होते याची माहिती प्रत्येकाला आहेच.त्यामुळे व्यसन करायचे की नाही हे प्रत्येकाने ठरवायचे आहे. आचरे गावात अंमली पदार्थ कोणी विक्री करत असेल तर त्याची माहिती द्या माहिती देणारयाचे नाव गुप्त ठेवले जाईल असे सांगत अंमली पदार्थ विरोधी लढ्यात जनतेने सहभागी होण्याचे आवाहन आचरा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिल व्हटकर यांनी आचरा तिठा येथे केले.
व्यसनमुक्ती सप्ताह निमित्त आचरा पोलीस स्टेशन तर्फे जनजागृती फेरीचे आयोजन करण्यात आले होते. नको अंमली पदार्थांची नशा आयुष्याची होईल दुर्दशा अशी घोषवाक्य असलेली पोष्टर घेत काढलेल्या जागृती फेरी नंतर आचरा तिठायेथे उपस्थितांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते. यावेळी त्यांच्या सोबत पोलीस उपनिरीक्षक वृषाली पाटील, पोलीस कर्मचारी मिनाक्षी देसाई, अभिजीत भाबल,ग्रामस्थ सुभाष सांबारी, विद्यानंद परब,अर्जुन बापर्डेकर, मंदार सरजोशी,सौ भावना मुणगेकर पोलीस पाटील विठ्ठल धुरी यांसह अन्य ग्रामस्थ, विद्यार्थी आदी उपस्थित होते.
यावेळी बोलताना वृषाली पाटील यांनी अंमली पदार्थांच्या सेवनाने शरीरावर होणारया दुष्परिणामांची माहिती दिली.सुभाष सांबारी, विद्यानंद परब यांनीही मार्गदर्शन केले.