
सावंतवाडी । प्रतिनिधी : महाराष्ट्र राज्याचे माजी शालेय शिक्षणमंत्री आणि विद्यमान आमदार दीपकभाई केसरकर यांनी आज आपल्या वाढदिवसाच्या निमित्ताने शिर्डी येथे जाऊन साईबाबांच्या पावन चरणी लीन होत दर्शन घेतले.
यावेळी श्री साईबाबा संस्थान ट्रस्टच्यावतीने आमदार दीपक केसरकर यांचे हृदयपूर्वक स्वागत करण्यात आले. यावेळी संस्थानच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांना साईबाबांची प्रतिमा, शाल आणि श्रीफळ देऊन सन्मानित केले.
या प्रसंगी बोलताना आमदार केसरकर यांनी, “वाढदिवसाच्या निमित्ताने साईबाबांच्या दर्शनाचा लाभ घेणे हे माझ्यासाठी अत्यंत भाग्याचे आहे. साईबाबांचे आशीर्वाद नेहमीच माझ्या पाठीशी आहेत आणि त्यांच्या कृपेनेच मला जनसेवा करण्याची संधी मिळत आहे,” असे कृतज्ञतापूर्वक नमूद केले.











