प्रा. आबा सावंत महाविद्यालयात मुंबई विद्यापीठाचा 169 वा वर्धापन दिन साजरा.

शंकर वैद्य साखरपा
संगमेश्वर तालुक्यातील शिक्षण प्रसारक मंडळ किरबेट संस्थेचे प्रा. आबा सावंत कला व वाणिज्य महाविद्यालय साखरपा मध्ये 18 जुलै रोजी मुंबई विद्यापीठ वर्धापन दिन साजरा करण्यात आला.
यानिमित्त ग्रामीण पारंपरिक खेळांचा प्रचार व या खेळांना उर्जितावस्ता यावी या उद्देशाने लगोरी , विटी दांडू व ईतर पारंपरिक खेळ महाविद्यालयीन स्तरावर घेण्यात आले.
तसेच शैक्षणिक वर्ष 2025- 26 मधील जिमखाना व सांस्कृतिक विभागाची पहिली सभा पार पडली .
यामध्ये वर्षभरामध्ये घेण्यात येणारे खेळ व सांस्कृतिक कार्यक्रम या संदर्भात चर्चा करण्यात आली.
कार्यक्रमाच्या प्रमुख महाविद्यालयाच्या उपप्राचार्या प्रा. सौ.शिल्पा वैद्य यांनी मुंबई विद्यापीठ वर्धापन दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या व खेळाचे महत्त्व पटवून दिले. सह शालेय उपक्रमामध्ये देखील सर्व विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घ्यावा असे आवाहन केले.
प्रास्ताविकामध्ये जिमखाना प्रमुख प्रा. सुरज लिंगायत यांनी ग्रामीण भागातील लोप पावत चाललेले खेळ खेळून मुलांनी शारीरिक आणि मानसिक क्षमता वाढवावी असे प्रतिपादन केले . विद्यार्थ्यांनी मोबाईल खेळामधून बाहेर पडून मैदानी खेळ खेळावेत या हेतूने या स्पर्धा घेण्यात आल्या . यामध्ये सर्व विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. कार्यक्रमाच्या आभार प्रसंगी एन.एस.एस . विभाग प्रमुख प्रा. प्रसाद झेपले यांनी मुंबई विद्यापीठ स्थापनेची जडणघडण याविषयी मार्गदर्शन केले. व जगाला नवी दिशा देणारे गुणवंत, किर्तीवंत विद्यार्थी घडविणाऱ्या मुंबई विद्यापीठाच्या 169 व्या वर्धापन दिनाच्या शुभेच्छा देऊन कार्यक्रमाची सांगता झाली.