मसुरे | झुंजार पेडणेकर : समाजात ज्येष्ठ नागरिकांचा सन्मान झाला पाहिजे. आनंद वाटल्याने तो आणखी वाढतो. त्यामुळे प्रत्येक व्यक्तीने आनंदी राहण्याचा तसेच आनंद वाटण्याचे काम केले पाहिजे. विद्यार्थ्यांनी सुद्धा भविष्यात चांगलं यश मिळण्यासाठी मोठ्या थोर व्यक्तींचा आदर्श डोळ्यासमोर ठेवावा. या गावाच्या जडणघडणीमध्ये जेवढे शक्य आहे तेवढे योगदान देण्याचा प्रयत्न आपला राहील असे प्रतिपादन उद्योजक सचिन माणगावकर यांनी पळसंब येथे केले. पळसंब ग्रामस्थ मित्र मंडळ आयोजित जेष्ठ नागरिक सेवा संघ पळसंबच्या वतीने जेष्ठ नागरिक मेळावा, सत्कार समारंभाचे आयोजन पळसंब शाळा येथे करण्यात आले होते. सदर कार्यक्रम उद्योजक सचिन माणगावकर यांनी पुरस्कृत केला होता. यावेळी व्यासपीठावर उद्योजक श्री. सचिन माणगावकर, सारेगमप फेम सौ. मनस्वी घारे, जेष्ठ नागरिक उपाध्यक्ष श्री. मधुकर कदम, देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष श्री. रमेश परब, केंद्रप्रमुख श्री. देवू जंगले, शालेय अध्यक्ष श्री. रविकांत सावंत, श्री.विश्वनाथ गोलतकर, पळसंब उपसरपंच श्री. अविराज परब, मुख्याध्यापक श्री. विनोद कदम, पोलीस पाटील सौ पूनम गोलतकर, सुरेश गावकर, सौ. माणगावकर, देवस्थान मानकरी रामकृष्ण पुजारे, सामाजिक कार्यकते श्री. प्रमोद सावंत, माजि सरपंच श्री. चंद्रकांत गोलतकर, शालेय समिती उपाध्यक्ष श्री. रामदास चव्हाण, सोनगटे मॅडम , अशोक जुवेकर इत्यादी मान्यवर उपस्थित होते
श्री. माणगावकर, मनस्वी घारे, केंद्रप्रमुख जंगले इत्यादी मान्यवराचा सत्कार करण्यात आला.
सारेगमप फेम सौ .मनस्वी घारे यांनी आपल्या शैलीत गायनाने कार्यक्रमाची शानदार सुरुवात करत जेष्ठ नागरिकांची व उपस्थिताची मने जिकंली. यावेळी शाळेतील मुलांना शालेय साहित्याचे वाटप तसेच जेष्ठ नागरिकांचा सन्मान करत गृहपयोगी साहित्य वाटप मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. गट शिक्षणाधिकारी श्री. दिक्षित, आचरा पोलिस स्टेशनचे पोलीस उप निरीक्षक श्री. विलास टेबुलकर व श्री. तुकाराम पडवळ उपस्थित होते. सचिन माणगावकर यांनी शाळा सुशोभिकरण कमानी बांधकाम साठी 51000/ रुपये मदत जाहिर केली.
त्यावेळी मान्यवरांनी जेष्ठ नागरिकांना मोलाचे मार्गदर्शन केले . डबलबारी बुवा श्री. अखिलेश फाळके व बुवा संदिप पुजारे यांनी डबलबारी भजन केले. सुत्रसंचालन मसुरे गावचे सुपुत्र श्री. पंढरीनाथ मसुरकर यांनी केले.











