मंडणगडमध्ये सर्वाधिक ४७ मिमी पाऊस
रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यात आज, २१ जुलै २०२५ रोजी सरासरी ३२.९४ मिमी पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्याभरात एकूण २९६.५४ मिमी पाऊस पडल्याची माहिती मिळाली आहे.
आज सर्वाधिक पाऊस मंडणगड तालुक्यात झाला असून, तिथे ४७.०० मिमी पावसाची नोंद झाली आहे. त्याखालोखाल लांजा तालुक्यात ३६.६० मिमी आणि राजापूर तालुक्यात ३७.५० मिमी पाऊस पडला. दापोलीमध्ये ३७.२८ मिमी, संगमेश्वरमध्ये ३९.५० मिमी, गुहागरमध्ये २७.२० मिमी, तर रत्नागिरीत २५.६६ मिमी पावसाची नोंद झाली आहे. खेड तालुक्यात २३.४२ मिमी, तर चिपळूणमध्ये २२.४४ मिमी पाऊस पडल्याचे हवामान विभागाकडून सांगण्यात आले.
जिल्ह्यात आज समाधानकारक पाऊस झाल्याने शेतीच्या कामांना गती येणार असून, पाणी पातळीत वाढ होण्यास मदत होईल अशी अपेक्षा आहे.












