ज्ञानदीप इंग्लिश मीडियम स्कूल (सी बी एस ई )मोरवंडे- बोरज मध्ये ग्रंथ प्रदर्शन संपन्न. 

खेड :

ज्ञानदीप शिक्षण प्रसारक मंडळ खेड (रत्नागिरी) संचलित, ज्ञानदीप इंग्लिश मीडियम स्कूल (सी बी एस ई) मोरवंडे -बोरज, खेड येथे दि. 19 जुलै 2025 रोजी द. बुकलँडचे चिपळूण यांचे मार्फत ग्रंथ प्रदर्शन व विक्री आयोजित केले होते. त्यावेळी संस्थेचे सरचिटणीस मा. श्री माधव पेठे यांच्या हस्ते प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले.

यामध्ये पाचशेहून अधिक पुस्तकांचे प्रदर्शन भरवण्यात आले होते. त्यानंतर द. बुकलँड व्यवस्थापक श्री. दिपक महाडिक यांनी मुलांना पुस्तके वाचण्याबाबतचे मार्गदर्शन केले. प्रशालेचे प्राचार्य मा. श्री.भरत मोरे यांनी विद्यार्थी व शिक्षक यांना या ग्रंथ प्रदर्शनाचा अधिकाधिक लाभ घ्यावा व आपले ज्ञान समृद्ध करावे असे आवाहन केले. सदर कार्यक्रमात बहुसंख्य विद्यार्थी व शिक्षकांनीही पुस्तके खरेदी केली. या प्रदर्शनाचा लाभ प्रशालेतील सर्व विद्यार्थी शिक्षक व पालकांनीही घेतला.

 

सदर कार्यक्रमाला संस्थेचे सरचिटणीस मा. श्री. माधव पेठे, प्रशालेचे प्राचार्य मा. भरत मोरे , उच्च माध्यमिक विभाग प्रमुख श्री राजेश किट्टद , प्राथमिक विभाग प्रमुख सौ. शर्वरी शिर्के तसेच सहाय्यक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

ज्ञानदीप इंग्लिश मीडियम स्कूलच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी या कार्यक्रमास शुभेच्छा दिल्या.