मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त विजय केनवडेकर, गणेश कुशे यांचे सामाजिक सेवाकार्य
अमित खोत | मालवण : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त मालवण नगरपालिकेतील 58 स्वच्छता दुत तसेच महाराष्ट्र विद्युत महामंडळाच्या 20 लाईनमन यांना भाजपा जिल्हा उपाध्यक्ष विजय केनवडेकर, माजी गटनेते गणेश कुशे यांच्या वतीने रेनकोट वाटप करण्यात आले. यावेळी माजी नगराध्यक्ष सुदेश आचरेकर, ललित चव्हाण, सौ .पूजा सरकारे, राजू परब,पप्पू गावकर, बाळू मालवणकर, राजा मांजरेकर, महेश वरक उपस्थित होते.











