शिरगाव( प्रतिनिधी) देवगड तालुक्यातील तोरसोळे गावचे जागृत ग्रामदैवत श्री भगवती देवीच्या देवालयात १ डिसेंबर रोजी सात प्रहरांच्या अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. यानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रम होणार आहेत. या हरिनाम सप्ताहास ग्रामस्थ, भाविक, भजनी मंडळींनी उपस्थित राहून हरिनामाची शोभा वाढवावी, असे आवाहन श्री देवी भगवती देवस्थान, बारा-पाच मानकरी, तोरसोळे ग्रामस्थ मंडळींच्या वतीने करण्यात आले आहे.












