पक्ष प्रवेशातून कौटुंबिक नाती व जिवाभावाची शिवसेना वाढवूया: आमदार निलेश राणे
आमदार निलेश राणे, जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांचा उबाठा गटाला पुन्हा धक्का
विभागप्रमुख राजेश गावकर यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश
ग्रामस्थांची मागणी असणारे गावचे मसुरे नाव पुन्हा आणणार
मसुरे | झुंजार पेडणेकर मागील दहा वर्षे हा मतदारसंघ विकासाकामात मागे पडला. बजेट मधून पैसेच आले नाहीत. मात्र आता विकास थांबणार नाही. बजेट मधून यावर्षी सर्वाधिक विकासनिधी येणार. कुडाळ मालवण विकास आराखडा 200 कोटीच्या वर मागील दहा वर्षात गेला नाही तो या वर्षी 1200 कोटी प्रस्तावित आहे. वीज सब स्टेशनं चार वरून 17 होणार. मालवण कुडाळचे वीज प्रश्न प्राधान्याने सुटणार आहेत. विकासकामांना शेकडो कोटी निधी येत राहील. एका बाजूने विकास होत असताना शिंदे साहेबाना जे अभिप्रेत असा शिवसेना पक्ष एक नंबर वर करण्यासाठी काम करूया.
जिल्हा प्रमुख दत्ता सामंत यांच्या कामाला तर तोडच नाही.
पक्ष प्रवेश सुरूच राहतील. पक्ष प्रवेशातून जिवा भावाची आपली शिवसेना वाढवूया. कौटुंबिक नाती जपूया आणि वाढवूया. ज्या विश्वासाने मसुरे माजी उपसरपंच राजेश गांवकर व सहकारी यांनी शिवसेना पक्षात प्रवेश केला आहे त्या विश्वासाला कधीही तडा जाऊ देणार नाही असे प्रतिपादन आमदार निलेश राणे यांनी मसूरे येथे केले.
शिवसेना उबाठा गटाचे मसुरे विभागप्रमुख तथा माजी उपसरपंच राजेश गावकर, माजी ग्रा सदस्य राघवेंद्र मुळीक, रीया आंगणे यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी आमदार निलेश राणे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला त्यावेळी ते बोलत होते. यावेळी मसुरे विभागाच्या वतीने आमदार निलेश राणे यांचा भव्य सत्कार करण्यात आला. यावेळी व्यासपीठावर उपनेते संजय आंग्रे, जिल्हाप्रमुख दत्ता सामंत, सचिव दादा साईल, संजय पडते, तालुकाप्रमुख निलेश बाईत, राजा गावडे, युवा सेना जिल्हाध्यक्ष संग्राम साळसकर, श्रीमती पाटकर, विनायक बाईत, दीपक पाटकर, सौ सरोज परब, सौ गायत्री ठाकूर, सौ लक्ष्मी पेडणेकर, निलेश गावकर, छोटू ठाकूर, शिवाजी परब आदी उपस्थित होते.
विकास कामाना निधी अपुरा पडणार नाही!
यावेळी आमदार निलेश राणे म्हणाले, गावाचे एकमत असल्यास मर्डे ग्रामपंचायतचे मसूरे नाव पुन्हा कायम केले जाईल. रमाई नदि मधील गाळ काढण्याबाबत नियोजनात्मक काम करूया. खाजणवाडी खार बंधाऱ्यासाठी स्पेशल केस करावी लागली तरी केली जाईल. आज प्रवेश करून खऱ्या शिवसेनेत आपण आलात. शिंदे साहेबांनी संधी दिल्यामुळे विधिमंडळात तुमचे प्रश्न मांडत आहे. इकडे दत्ता सामंत आपली शिवसेना वाढवत आहेत. सामंत साहेब यांचा पक्ष वाढवण्याचा वेग प्रचंड आहे. सामंत साहेबांचा एकही शब्द पडू देणार नाही. ही जिवाभावाची संघटना आहे. शिवसैनिक हे पद माझ्यासाठी फार मोठे आहे. पक्ष वाढवा, पक्ष जपा. येथील विकास कामांसाठी सर्व निधी पूर्णपणे मिळेल. महायुतीचे शासन सर्व घटकाना न्याय देण्यासाठी आहे असे ते म्हणाले.


आम. निलेश राणे यांच्या कार्याच्या प्रेरणेतून आजचे पक्षप्रवेश – जिल्हाप्रमुख दत्ता सामंत
जिल्हाप्रमुख दत्ता सामंत म्हणाले, आमदार निलेश राणे योग्य पद्धतीने काम करत आहेत. त्यामुळे त्यांच्या मार्गदर्शनाखाली काम करण्यासाठी आजचे सर्व प्रवेश होत आहेत. 2024 मध्ये सर्व निवडणुकीमध्ये आपण सर्वांनी एकत्र येऊन जिल्ह्याचे नाव राजकारणात उच्च स्थानावर नेले. अनेक प्रश्न आमदार निलेश राणे धडाडीने पूर्ण करत आहेत. निलेश साहेबांच्या नेतृत्वात मी झपाटल्या प्रमाणे काम करत आहे. तळाशील गाव समुद्रा पासून वाचावे यासाठी आमदार निलेश राणे यांनी त्वरित योगदान दिले. या भागाच्या विकासासाठी उर्वरित कामे पूर्ण केली जातील. अभ्यासू आमदार निलेश राणे यांच्या मागे सर्वांनी अधिक ताकदीने उभे रहावे असे आवाहन केले.
गावच्या विकासासाठी खऱ्या शिवसेनेत – राजेश गावकर
शिवसेनेत प्रवेश केलेले उबाठा मसुरे विभाग प्रमुख राजेश गावकर म्हणाले, प्रवेशाचा निर्णय घ्यायला वेळ लागला त्यामुळे दिलगिरी व्यक्त करतो. माझ्या गावचा विकास झालाच पाहिजे हीच माझी भावना आहे. आमदार निलेश राणे यांच्या कामाच्या प्रचंड उराक्यामुळे खऱ्या शिवसेनेत मी प्रवेश करत आहे. रमाई नदी गाळ, मसुरे ग्रामपंचायत नाव कायम रहावे, चांदेर – खाजणवाडी या भागात खार बंधारा व्हावा अशी मागणी त्यांनी केली. यावेळी उपनेते संजय आंग्रे, जिल्हा सचिव दादा साईल, उपजिल्हा प्रमुख संजय पडते, माजी जि प अध्यक्ष सौ सरोज परब यांनी मार्गदर्शन केले.
शिवसेना पक्षप्रवेश

यावेळी मसुरे विभाग प्रमुख राजेश गावकर, उपविभाग प्रमुख राघवेंद्र मुळीक, माजी ग्राप सदस्य रिया आंगणे, सामाजिक कार्यकर्ते बाबू आंगणे, प्रकाश चव्हाण, शैलेश आंगणे, गुरुदास कावले, शाखाप्रमुख गणेश गावकर, सुधीर गावकर, सुहास गावकर, राजन गोळे, उत्तम गावकर, दत्तराज गावकर, शर्मिला गावकर, शिवानी गावकर, एकनाथ मेस्त्री, तुकाराम सावंत, एकनाथ परब, गणेश भोगले, महेश मूळये, महेश वंजारे, पांडुरंग परब, विनय परब, शंकर गावकर, शिवराम गावकर, संतोष गावकर, शुभांगी गावकर, काजल गावकर, राजाराम मुळीक, रमेश गावकर, बळवंत गावकर, राजू मुळीक, बाबुराव राणे, बाबू चौगुले अशा प्रमुख उबाठाच्या कार्यकर्त्यांसह मसुरे जिल्हा परिषद मतदार संघातील खाजनवाडी, चांदेर, मागवणे, तळाणी, मर्डे , वेरली, खेरवंद, आंगणेवाडी, देऊळवाडा या भागातील सुमारे 200 उबाठा कार्यकर्त्यांनी शिंदे शिवसेनेमध्ये प्रवेश केला.
यावेळी वेरली सरपंच धनंजय परब, हडी सरपंच प्रकाश तोंडवळकर, बाबू परब, अनंत भोगले, पांडुरंग ठाकूर, शिवाजी परब, सचिन पाटकर, अशोक बागवे, उदय बागवे, राजू सावंत ,उपजिल्हा प्रमुख अरविंद करलकर, कुडाळ मालवण विधानसभा प्रमुख बबन शिंदे, शहरप्रमुख दिपक पाटकर, उपतालुकाप्रमुख बाळू नाटेकर आदी मसुरे विभागातील पदाधिकारी, कार्यकर्ते ग्रामस्थ उपस्थित होते. प्रस्ताविक दत्तप्रसाद पेडणेकर, सूत्रसंचालन पंढरीनाथ मसुरकर यांनी केले.












