सिंधुदुर्गात लवकरच दशावतार सांस्कृतील मेळावा

आमदार निलेश राणे यांच्या उपस्थितीत दशावतार कलावंत यांची बैठक संपन्न

अमित खोत | मालवण : दशावतार कलावंत यांचा मेळावा लवकरच सिंधुदुर्ग जिल्ह्यात आयोजित करण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर दशावतार कलावंत यांची बैठक आमदार निलेश राणे यांच्या उपस्थितीत संपन्न झाली.

आमदार निलेश राणे यांच्या पुढाकारातून सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांच्याशी दशावतार कलाकारांच्या विविध समस्यांवर विशेष बैठकीत सविस्तर चर्चा झाल्यानंतर, त्या चर्चेचा आढावा घेण्यासाठी आमदार निलेश राणे यांनी मालवण दौऱ्यात कलाकारांना विशेषतः आमंत्रित केले.

यावेळी “दशावतार सांस्कृतिक मेळावा” या महत्त्वपूर्ण उपक्रमासाठी मंत्री आशिष शेलार यांच्याशी पुन्हा संपर्क साधून लवकरच मेळाव्याची तारीख निश्चित करण्याचे ठरवले. कोकणची ही समृद्ध परंपरा पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी कटिबद्ध आहोत. असे आमदार निलेश राणे यांनी या निमित्ताने आश्वासित केले. यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत व अन्य पदाधिकारी उपस्थित होते.