जिल्हास्तरीय शिक्षक मूल्यवर्धन प्रशिक्षण सुरू होणार 30 जुलैपासून

रत्नागिरी /वार्ताहर : 
सन 2025 /26 मध्ये समग्र शिक्षा अंतर्गत मूल्यवर्धन जिल्हास्तरीय शिक्षक प्रशिक्षण सोमवार दिनांक 28 जुलै 2025 ते 31 जुलै 2025 या कालावधीत रत्नागिरी येथे आयोजित करण्यात आले होते. मात्र हे प्रशिक्षण दिनांक 30 जुलै 2025 पासून घेण्यात येणार आहे

अखिल महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाच्या माध्यमातून दिलीप देवळेकर यांनी या तारखेत बदल व्हावा हि विनंती पालकमंत्री उदय सामंत यांना केली होती त्शियाला पालकमंत्क्षरी यांनीसकारात्मक प्रतिसाद देऊन [प्रशिक्षण दिवस बदलण्याचे निर्देश दिले. अखिल महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ प्राथमिक शिक्षकांच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी नेहमी कटीबद्ध आहे याची प्रचिती जिल्हाध्यक्ष दिलीप देवळेकर यांनी आपल्या आजच्या कार्यातून दाखवून दिली आहे आणि आपल्या वेगवान कामाची प्रचिती दिली आहे त्यामुळे प्राथमिक शिक्षकांकडून अखिल महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाचे सर्व स्तरातून अभिनंदन केले जात आहे.