राजकोट येथील भव्य दिव्य नारळ लढवणे स्पर्धा

शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत, युवासेना नेत्या अपूर्वा सामंत यांच्या हस्ते उद्घाटन

शिवसेना उपनेते संजय आंग्रे यांची प्रमुख उपस्थिती ; स्पर्धकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

बांधकाम सभापती सहदेव बापर्डेकर व सोनू खांदारे पुरस्कृत स्पर्धेचे राजकोट बॉईज, राजकोट मित्रमंडळाचे भव्य आयोजन

मालवण | प्रतिनिधी : राजकोट बॉईज आणि राजकोट मित्रमंडळाच्या वतीने आयोजित आणि बांधकाम सभापती सहदेव बापार्डेकर व युवा उद्योजक सोनू खांदारे पुरस्कृत भव्य स्वरूपात आयोजित करण्यात आलेल्या महिला व पुरुष गटातील नारळ लढवणे स्पर्धेचे उद्घाटन शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत व महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन सदस्य तथा युवासेना नेत्या अपूर्वा किरण सामंत यांच्या हस्ते, शिवसेना उपनेते संजय आंग्रे यांच्या प्रमुख उपस्थितीत राजकोट किल्ला येथे उत्साहपूर्ण वातावरणात झाले. या स्पर्धेला महिला व पुरुष स्पर्धकांसह नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

यावेळी संजय आंग्रे, दत्ता सामंत व अपूर्वा सामंत यांनी स्पर्धेच्या भव्य आयोजनाचे तसेच राजकोट बॉईज व राजकोट मित्रमंडळाच्या आयोजकांचे विशेष कौतुक केले. पारंपरिक नारळ लढवणे स्पर्धेला मोठ्या स्वरूपात व्यासपीठ उपलब्ध करून दिल्याबद्दल आयोजकांचे अभिनंदन करण्यात आले. आमदार निलेश राणे, आमदार किरण सामंत यांच्याही सामाजिक कार्याचा या स्पर्धेच्या निमित्ताने विशेष गौरव करण्यात आला.

कार्यक्रमाला उपनगराध्यक्ष दीपक पाटकर, बांधकाम सभापती सहदेव बापर्डेकर, युवा उद्योजक सोनू खांदारे, सुनील खांदारे, माजी नगराध्यक्ष महेश कांदळगांवकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण, शिवसेना तालुकाप्रमुख मंदार लुडबे, युवासेना जिल्हाप्रमुख संग्राम साळसकर, शहर संघटक राजू बिडये, सोशल मीडिया प्रमुख किसन मांजरेकर, ऋत्विक सामंत, बबन रेडकर, नंदू देसाई, अक्षय मालवणकर, नागेश परब, महिला व बालकल्याण सभापती अन्वेषा आचरेकर, उपसभापती अश्विनी कांदळकर, गीता बापर्डेकर, गौरी खांदारे, रूपा बिडये, अनिता फर्नांडिस, मंदा जोशी, नगरसेविका महानंदा खानोलकर, विजू कांदळकर, जॉन नरोना, परशुराम पाटकर, यश कवठकर, दीपक कुडाळकर, राजापूर जि.प. सदस्य प्रकाश पोळेकर, प्रतीक मठकर, पं.स. सदस्य अविनाश पराडकर, सुभाष गुरव, अजित नारकर, भरत लाड, जितेंद्र खांबकर, संदीप बारसकर, सुरेश येनारकर, प्रसाद गुरव, सुभाष बापारकर, शाम वाक्कर यांच्यासह अन्य पदाधिकारी, राजकोट बॉईज व राजकोट मित्रमंडळाचे सदस्य उपस्थित होते. यावेळी महिला भगिनींची लक्षणीय उपस्थिती होती.

*बक्षिसांचा वर्षाव*

महिला गटातील विजेत्यांसाठी बांधकाम सभापती सहदेव बापार्डेकर व युवा उद्योजक सोनू खांदारे यांच्या सौजन्याने आकर्षक बक्षिसे ठेवण्यात आली आहेत. प्रथम क्रमांकाच्या विजेत्यास सोन्याची नथ, मिक्सर व मानाची पैठणी, द्वितीय क्रमांकासाठी फ्रीज व पैठणी, तर तृतीय क्रमांकासाठी वॉशिंग मशीन व पैठणी देण्यात येणार आहे.
पुरुष गटातील विजेत्यास ५५ हजार ५५५ रुपये व आकर्षक चषक, द्वितीय क्रमांकास २५ हजार ५५५ रुपये व आकर्षक चषक, तर तृतीय व चतुर्थ क्रमांकाच्या विजेत्यांना प्रत्येकी ५ हजार ५५५ रुपये व आकर्षक चषक देण्यात येणार आहे. याशिवाय अन्य विविध आकर्षक बक्षिसांचाही समावेश आहे.
रात्री उशिरापर्यंत रंगलेल्या या नारळ लढवणे स्पर्धेत महिला व पुरुष स्पर्धकांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. स्पर्धेतील प्रत्येक फेरीत रंगलेला थरार पाहण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.

राजकोट येथील नारळ लढवणे स्पर्धेचे उद्घाटन शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत व महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे सदस्य तथा युवासेना नेत्या अपूर्वा किरण सामंत यांच्या हस्ते, शिवसेना उपनेते संजय आंग्रे यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले. यावेळी आयोजक व मान्यवर उपस्थित होते. यावेळी महिला भगिनींची मोठी उपस्थिती होती. (अमित खोत, मालवण)