जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांनी शाखाप्रमुख पदी दिली नियुक्ती
मालवण | प्रतिनिधी : सुकळवाड येथील उबाठा कार्यकर्ते अभिजित उर्फ बाळू पावसकर यांनी शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांच्या प्रमुख उपस्थित शिवसेनेत प्रवेश केला. दरम्यान, बाळू पावसकर यांना शिवसेना शाखा प्रमुख पदी नियुक्ती देण्यात आली आहे.
आमदार निलेश राणे यांच्या नेतृत्वात मालवण कुडाळ गतिमान विकास साध्य करत आहे. त्यांच्याच विकास कार्यावर प्रेरित होऊन शिवसेनेत मोठया प्रमाणात पक्ष प्रवेश होत असल्याचे शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांनी सांगितले.
यावेळी जिप माजी वित्त व बांधकाम सभापती अनिल कांदळकर, माजी महिला बालकल्याण सभापती माधुरी बांदेकर, माजी उपसभापती प्रसाद मोरजकर, सरपंच युवराज गरुड, युवासेना जिल्हाप्रमुख संग्राम साळसकर, युवक तालुकाप्रमुख स्वप्नील गावडे, जिल्हा कार्यकारणी चिटणीस चेतन मुसळे, सागर कुशे, विक्रम मोरजकर, किशोर पेडणेकर, मनोज वायंगणकर, विशाल वाळके, प्रकाश पावसकर, दशरथ वळंजू, सुभाष म्हसकर, बाबुराव म्हसकर, सुरेंद्र हातणकर, सोनाली गावडे, सौख्या कुशे, समीर परब यांसह अन्य पदाधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते.













