आंतरराष्ट्रीय युवा दिनानिमित्त युवक युवती यांच्यामध्ये एच आय व्ही एड्स विषयी जनाजागृती व्हावी या उद्देशाने, जिल्हा शासकीय सामान्य रुग्णालय, रत्नगिरी व उपजिल्हा रुग्णालय दापोली यांच्या संयुक्त विद्यमानाने रेड रन मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. सदर रेड रन स्पर्धा जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. भास्कर जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आली. मॅरेथॉन स्पर्धेचे उद्घाटन दापोलीचे उपविभागीय अधिकारी डॉ. विजयकुमार सूर्यवंशी, दापोली पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक.महेश तोरस्कर जिल्हा कार्यक्रम अधिकारी सचिन पाटील, वैद्यकीय अधीक्षक डॉ. पवन सावंत जे सी आय पदाधिकारी डॉ. सुयोग भागवत, जालिंदर पाटील (राम राजे कॉलेज) प्रा.गिरमकर (वराडकर कॉलेज) तसेच वैद्यकीय अधिकारी सर्व आरोग्य कर्मचारी उपस्थित होते.
ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी जिल्हा कार्यक्रम अधिकारी सचिन पाटील, उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर पवन सावंत, उपजिल्हा रुग्णालय दापोली येथील वैद्यकीय अधिकारी व इतर सर्व कर्मचारी यांनी मेहनत घेतली.
रेड रन मॅरेथॉन स्पर्धेमध्ये
प्रथम क्रमांक यश शिर्के,
द्वितीय क्रमांक अथर्व चव्हाण,
तृतीय क्रमांक प्रथम गोवले,
चौथा क्रमांक सुनील रेवाळे,
पाचवा क्रमांक आयुष बर्जे,
मुली
प्रथम क्रमांक रेशम कोळंबे,
द्वितीय क्रमांक दीक्षा कडू,
तृतीय क्रमांक सानिया नेवरेकर,
चौथा क्रमांक सिद्धी चीनकाटे,
पाचवा क्रमांक आकांक्षा रामाने.












