देवरूख (प्रतिनिधी):
संगमेश्वर तालुक्यातील माळवाशी येथे १० जानेवारीपासून टेनिस बॉल ओव्हर आर्म क्रिकेट स्पर्धा होणार आहे. ओम साई सेवा मंडळ कडूवाडीने कै. सरपंच वैजयंती करंडे स्मृती चषक स्पर्धेचे आयोजन केले आहे.
या स्पर्धेतील प्रथम विजेत्या संघाला 25 हजार 555 व चषक, द्वितीय 15 हजार 555 व चषक, तृतीय 5 हजार 555 व चषक, चतुर्थ 3 हजार 333 व चषक देऊन गौरविण्यात येणार आहे. उत्कृष्ट गोलंदाज, फलंदाज, मालिकावीर यांना चषक देण्यात येणार आहे. चार शटकांचे हे सामने ओपन व पंचक्रोशीतील स्तरावर खेळवले जाणार आहेत. कै. पांडुरंग करंडे व कै. शिवराम कडू क्रीडा नगरी माळवाशी-कडूवाडी येथे हे सामने 10 ते 12 जानेवारी दरम्यान होणार आहेत. अधिक माहितीसाठी महेंद्र कडू 7743832790, विशाल भडवलकर 8149822240, जितेंद्र कडू, प्रवीण करंडे यांच्याशी संपर्क साधावा व स्पर्धेत सहभागी व्हावे, असे आवाहन निनावी देवी क्रीडा मंडळ व कडूवाडी मंडळाने केले आहे. या स्पर्धेच्या उद्घाटनासाठी आमदार शेखर निकम, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष रोहन बने, भाजपा संघटक प्रमोद अधटराव, प्रफुल्ल बाईत, उद्योजक सुरेश कदम, युवा नेते प्रद्युम्न माने, सरपंच निकिता करंडे, उपसरपंच सुनील सावंत, राजू सावंत, दिलीप कडू, अनंत कडू आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.












