दादा मेस्त्री यांचे निधन

मसुरे |प्रतिनिधी

मालवण तालुक्यातील वायंगवडे मेस्त्रीवाडी येथील रहिवाशी श्रीधर उर्फ दादा धोंडू मेस्त्री (93 वर्ष ) यांचे हृदयविकाराच्या धक्याने निधन झाले. त्यांच्या पश्चात तीन मुलगे, तीन मुली, सुना, नातवंडे, पुतणे असा मोठा परिवार आहे.

ते आर्किटेक म्हणून मालवण तालुक्यामध्ये प्रसिद्ध होते. वायंगवडे गावच्या माजी सरपंच व प्रगती ग्राम संघाच्या अध्यक्ष सौ सीता धोंडू मेस्त्री यांचे ते सासरे व कसाल येथील फर्निचर व्यवसायिक नंदू मेस्त्री यांचे ते काका होय.