अरुंधती मेहेंदळेची ‘एआय’ मध्ये डॉक्टरेट!

मसुरे येथील डॉ.सुधीर मेहंदळे यांची कन्या

मसुरे | झुंजार पेडणेकर

मूळ मसुरे येथील आणि सध्या मुंबई येथे नोकरी निमित्त असणाऱ्या डॉ.सौ.अरूंधती योगेश निवतकर मेहेंदळे हिने शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर येथून इलेक्ट्रॉनिक्स इंजीनियरिंग मध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स हा विषय घेत पीएचडी संपादन करून घवघवीत यश संपादन केले आहे. तिच्या या यशाबद्दल सर्वत्र कौतुक होत आहे.

अरुंधती निवतकर मेहेंदळे हिचे मूळ घर मसुरे येथे असून तिचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण मसुरे गावातच झाले आहे. शालेय जीवनात अरुंधती ही अतिशय हुशार आणि मेहनती विद्यार्थिनी होती. मसुरे गावातील शिक्षण प्रेमी लोकप्रतिनिधी यांनी तिचे विशेष अभिनंदन केले आहे. अरुंधती या सध्या मुंबई जुहू येथील प्रतिष्ठित अशा एसएनडीटी इंजीनियरिंग कॉलेजमधील डाटा सायन्स विभागात प्रोफेसर म्हणून कार्यरत आहे. अरुंधती ही मसुरे येथील प्रथितयश असे डॉक्टर सुधीर मेहेंदळे यांची कन्या आणि मालवण शासकीय रुग्णालय येथील डॉक्टर अनिरुद्ध मेहेंदळे यांच्या भगिनी आहेत.