रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यात आज, २८ जुलै २०२५ रोजी, पावसाने हजेरी लावली असून, जिल्ह्याची सरासरी २१.५१ मिमी नोंदवली गेली आहे. आज जिल्ह्यात एकूण १९३.६३ मिमी पावसाची नोंद झाली आहे.
आज सकाळी ८ वाजेपर्यंतच्या आकडेवारीनुसार, मंडणगड तालुक्यात सर्वाधिक ३५.०० मिमी पावसाची नोंद झाली आहे. त्याखालोखाल खेडमध्ये ३१.२८ मिमी तर राजापूरमध्ये ३०.६२ मिमी पावसाची नोंद झाली आहे.
दुसरीकडे, रत्नागिरी तालुक्यात सर्वात कमी ७.५५ मिमी पावसाची नोंद झाली आहे, तर गुहागरमध्ये १२.८० मिमी आणि दापोलीमध्ये १६.५७ मिमी पाऊस पडला आहे. चिपळूणमध्ये २१.३३ मिमी आणि संगमेश्वरमध्ये २१.०८ मिमी पावसाची नोंद झाली आहे. लांजा तालुक्यात १७.४० मिमी पाऊस पडला आहे.
जिल्ह्यात सर्वदूर पाऊस झाल्याने शेतीत कामांना वेग येणार असून, पाणीसाठा वाढण्यास मदत होणार आहे.










