वैभववाडी प्रतिनिधी :
रविवारी रात्री करूळ घाटात दरड कोसळली. दरड कोसळल्याने वाहतूक ठप्प झाली आहे. ही घटना रात्री आठच्या सुमारास घडली. दरडीचा मोठा भाग रस्त्यावर आल्याने वाहनांच्या रांगा लागल्या आहेत. दरड हटवण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे.
गेले काही दिवस तालुक्यात मुसळधार पाऊस पडत आहे. त्याचा फटका करूळ घाटाला बसला. रविवारी आठ वाजता करूळ घाटात दरडीचा मोठा भाग रस्त्यावर आला. त्यामुळे घाटातील वाहतूक ठप्प झाली आहे. अचानक घटना घडल्याने रस्त्याच्या दोन्ही बाजूने लांबच लांब रांगा लागल्या आहेत. दरड हटविण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे.











