अजि सोनियाचा दिनु ssss–फोंडाघाट एज्युकेशन सोसायटीच्या इतिहासातील सुवर्णक्षण !

सुवर्णकन्या मनस्या फाले च्या यशाबद्दल न भूतोsss फोंडा बाजारपेठेतून संस्थेच्या मैदानावर जल्लोषात सत्कार!

कणकवली तालुका आणि जिल्हा सिंधुदुर्ग चा मनस्याकडून सन्मान !

फोंडाघाट | कुमार नाडकर्णी– आज सोमवार बाजार चा दिवस ! सकाळच्या सत्रात भाजी,किराणा, गृहोपयोगी खरेदीसाठी पेठेमध्ये तुडुंब गर्दी ! स्टॅन्ड परिसर ” मनस्या आगे बढो, हम तुम्हारे साथ है sss “फोंडावासीय तुम्हारे साथ हैsss ” च्या बुलंद घोषणांनी दुमदुमला. शूटिंग स्पर्धेत सुवर्णपदक मिळवून मनस्याची राष्ट्रीय स्तरावर निवड झाल्याने, फोंडाघाट पंचक्रोशीत प्रत्येक विद्यार्थीहा विद्यार्थिनीच्या घराघरात कौतुक होत आहे.काल रात्री उशिरा मनस्याचे अमरावतीहून आगमन झाले. ह

फोंडाघाट एज्युकेशन सोसायटीच्या संचालकांनी, नेटक्या संयोजनातून फोंडाघाट एसटी स्टँड ते बाजारपेठ मार्गे हायस्कूल मैदान पर्यंत सुवर्णकन्या मनस्याची उघड्या जीपला बॅनर लावून, तिच्या आई-वडिलांसह रॅली काढली.

 

 

पेठेत रस्त्या– रस्त्यामध्ये व्यापारी – ग्रामस्थ- महिला- सरपंच सौ संजना आग्रे, बालगोपाळ मंडळाकडून, गाडी थांबवून मनस्याचे कौतुक करताना सर्वांनी भेटवस्तू देऊन सन्मानित केले.सहभागी झालेल्या विद्यार्थीहा विद्यार्थिनींनी मनस्याच्या आणि संस्थेच्या जय-जयकारांनी बाजारपेठ दुमदुमून सोडली .शिस्तबद्ध आणि कौतुक मिरवणुकीला पर्जन्यधारेने सुद्धा थांबून रॅली निर्विघ्न पार पाडली…

 

 

 

प्रशालेच्या गेट पासून ध्वजस्तंभापर्यंत शाळेतील विद्यार्थी ,एनसीसी– स्काऊटच्या कॅडेट्सनी दुथर्फा उभे राहून मनस्यासह एनसीसी ॲडम ऑफिसर कर्नल तनुज मंडलिक, पी आय स्टाफ प्रदीप पाटील, डी.सी. रॉय ,संस्था पदाधिकारी– संचालक, सदस्य ,मनस्याचे आई-वडील यांना बँड पथकाच्या तालावर सहर्ष मानवंदना दिली. राष्ट्रगीत झाल्यानंतर उपस्थित मान्यवरांचे संचालकांनी स्वागत केले.यावेळी मार्गदर्शक आर्या भोगले यांनी मनस्याचा खडतर प्रवास, तिची जिद्द आणि विश्वास याबद्दल विवेचन करून तिला शुभेच्छा दिल्या.

 

 

 

आजवर शाळेतून शिकून गेल्यानंतर संस्थेचे गावाचे आणि पालकांचे नाव अनेकांनी मोठे केले. शालेय जीवनात शिकताना राज्यस्तरापर्यंत अनेकांनी यशस्वी प्रयत्न केले. मात्र मनस्याने केवळ नववी मध्येच अमरावतीमध्ये झालेल्या राज्यस्तरीय शूटिंग स्पर्धेत गोल्डमेडल मिळूवून ती फोंडाघाट संस्थेची गावाची, कणकवली तालुक्याची आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याची सुवर्णवेध घेणारी ” फोंडाघाट ची शान ” ठरली आहे. तिच्या दिल्ली येथे राष्ट्रीय स्तरावर होणाऱ्या स्पर्धेसाठी संस्था संपूर्ण सहकार्य करील, अशी ग्वाही देऊन चेअरमन राजू पटेल यांनी शुभेच्छा दिल्या यावेळी सचिव शेखर लीग्रस, शालेय शिक्षण समिती अध्यक्ष बबन पवार, सुभाष सावंत,रमेश भोगटे तसेच माधवी दळवी, सुंदर पारकर, रंजन चिके, हायस्कूल कॉलेजचे शिक्षक, प्राध्यापक, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

 

यावेळी संस्थेतर्फे चेअरमन राजू पटेल यांनी सुवर्णकन्या मनस्या आणि आंबोली पब्लिक स्कूल चा विद्यार्थी संस्कार धुरी आणि त्याचे प्रशिक्षक फोंडा गावचे सुपुत्र निखिल तेली यांचा श्रीफळ शाल पुष्पगुच्छ देऊन यथोचित सत्कार केला..

 

 

कर्नल तनुज मंडलिक यांनी सुद्धा मनस्यासह तिचे पालक, प्रशिक्षक आर्या भोगले मारुती लाड,अजिंक्य पोफळे,यांच्या अथक प्रशिक्षणाचे – ऊर्जेचे आणि कॅडेट घडविण्याचे कौतुक करताना, मनस्या दिल्लीमध्ये सुद्धा इच्छित यश मिळवेल असा विश्वास व्यक्त केला, आणि संस्थेच्या सदैव सहकार्याचे कौतुक केले.

 

 

मनस्या ने आपल्या यशाचे श्रेय सर्वप्रथम आई-वडील,तसेच प्रशालेतील शिक्षक,एनसीसी चे मार्गदर्शक अधिकारी,माझी शाळाही संस्थाहा ग्रामस्थ आणि माझ्या शाळेतील मित्र-मैत्रिणींना देताना, पुढील स्पर्धेत सर्वांच्या सदिच्छाच्या जोरावर नक्कीच यश मिळेल असा आत्मविश्वास व्यक्त केला.

 

 

यावेळी एनसीसी अधिकारी, मनस्याचे पालक,मार्गदर्शक, शिक्षक यांचा पदाधिकाऱ्यांनी सत्कार केला. फोंडाघाट पत्रकार संघाचे अध्यक्ष संजय सावंत, आणि सदस्य कुमार नाडकर्णी यांनी मनस्याचे कौतुक करून तिचा सत्कार केला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन संतोष जोईल सर यांनी केले