नीता दिलीप धुरी (SYBA) हिचा वक्तृत्व स्पर्धेत प्रथम क्रमांक

 

फोंडाघाट | कुमार नाडकर्णी — 

ऑल इंडिया बँक एम्प्लॉईज असोसिएशन तर्फे घेण्यात आलेल्या जिल्हास्तरीय खुल्या वक्तृत्व स्पर्धेत कला आणि वाणिज्य महाविद्यालय फोंडाघाटची विद्यार्थिनी नीता दिलीप धुरी (SYBA) हिने प्रथम क्रमांक पटकावला. प्रथम पारितोषिक रोख रक्कम रुपये 2500/- व प्रमाणपत्र देऊन तिला गौरवण्यात आले आहे.

 

56 व्या बँक राष्ट्रीयीकरण दिनानिमित्त ऑल इंडिया बँक एम्प्लॉईज असोसिएशन तर्फे कणकवली येथे *बँक राष्ट्रीयकरणानंतरचा भारत* या विषयावर वक्तृत्व स्पर्धा घेण्यात आली होती. या स्पर्धेला जिल्ह्यातील विविध महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता.

 

बँक राष्ट्रीयीकरणाचे महत्त्व व राष्ट्रीयकृत बँकांचे महत्त्व सामान्य जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी सदर स्पर्धा आयोजित केल्याचे आयोजक कॉ. निखिल साटम यांनी सांगितले. कॉ संतोष रानडे यांच्या मार्गदर्शनाखाली व कणकवली कॉलेजच्या संयुक्त विद्यमाने सदर स्पर्धा यशस्वीपणे पार पडली होती.

 

फोंडाघाट एज्युकेशन सोसायटीचे सर्व पदाधिकारी व संचालक यांनी तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ पुरंधर नारे, सर्व शिक्षक यांनी तिचे हार्दिक अभिनंदन केले.