सावंतवाडी । प्रतिनिधी :
सावंतवाडी शहरात १२ फूट लांबीचा भलामोठा अजगर पकडण्यात आला. तहसीलदार बंगल्याशेजारी, जयवंत घोगळे यांच्या अंगणात हा अजगर दिसल्याने परिसरात एकच खळबळ उडाली होती.
घटनेची माहिती मिळताच राजू धारपवार यांनी तातडीने वनविभागाशी संपर्क साधला. माहिती मिळताच वनविभागाचे कर्मचारी जलदगतीने घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी अत्यंत कौशल्याने या अजगराला पकडले. वनविभागाच्या या तत्पर कारवाईमुळे स्थानिकांनी सुटकेचा निःश्वास टाकला.
या अजगराला सुरक्षितपणे नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आल्याचे वनविभागाकडून सांगण्यात आले.











