तोरसोळे येथे गुरांच्या गोठ्यावर झाड पडून सुमारे ४० हजाराचे नुकसान

देवगड (प्रतिनिधी)

देवगड तालुक्यात सोमवारी झालेल्या वादळी वाऱ्यामुळे तोरसोळे (गावकर वाडी) येथील
सुभाष शिवराम इंगळे यांच्या मालकीच्या गुरांच्या गोठ्यावर
पहाटे सुमारे ३:३० वाजता फणसाचे झाड कोसळून गोठ्याचे अंशतः सुमारे ४० हजाराचे नुकसान झाले.
सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.
दरम्यान, देवगड तालुक्यात आज ०९ मिमी इतका पाऊस नोंदवला गेला असून, यंदा एकूण पावसाची नोंद १९८९ मिमीवर पोहोचली आहे.