जि. प. माजी सदस्य नेत्रा ठाकूर, महेश नाटेकर यांचा सेनेत प्रवेश
गुहागर प्रतिनिधी
वेळणेश्वर गटामध्ये एकतर्फी दबदबा ठेवणाऱ्या जिल्हा परिषदेच्या माजी सदस्य नेत्रा ठाकूर आणि पडवे जि. प. गटाचे सदस्य महेश नाटेकर यांच्यासह पंचायत समिती माजी सभापती, विद्यमान सरपंच आणि माजी सरपंच, उबाठा पक्षाचे विभाग प्रमुख व सुमारे सहा हजार कार्यकर्त्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उद्योग मंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. यावेळी बोलताना ना. शिंदे म्हणाले, जो आज तुम्ही आमच्यावर विश्वास दाखवला, त्या विश्वासाला कधी तडा जाऊं देणारं नाही. या भागाच्या विकासाची जबाबदारी ही आमची राहिलं, अशी ग्वाही त्यांनी दिली.
हेदवतड येथील मच्छीमार समाजाचा सभागृहामध्ये हा पक्षप्रवेश पार पडला. या पक्षप्रवेशाने गुहागर तालुक्यात उबाठाच्या शिवसेनेला मोठा दणका बसला आहे. यावेळी मंत्री भरत गोगावले, माजी आमदार संजय कदम, जिल्हा प्रमुख शशिकांत चव्हाण, माजी सभापती राजेश बेंडल, विलास वाघे, दत्ताराम निकम, विपुल कदम, बापू म्हाप, रामचंद्र हुमणे, पांडुरंग पाते, तुकाराम निवाते, गुहागर तालुकाध्यक्ष दीपक कनगुटकर, प्रदीप सुर्वे, हयात खले, निलेश मोरे, अमरदीप परचुरे, अमोल गोयथळे, रोहन भोसले आदी उपस्थित होते.












