कविता वर्षावासाच्या, कविता परिवर्तनाच्या !   

3 ऑगस्ट रोजी कणकवलीत रंगणार साहित्य,संगीत आणि पावसाच्या कवितांचा सुरेल सोहळा!!   

कणकवली   :            मराठी साहित्यातील निवडक कवितांचे अभिवाचन आणि अविस्मरणीय पाऊसगाण्यां ची मैफल यांचा एकत्रित अनुभव देणारा खास कार्यक्रम कविता वर्षावासाच्या,कविता परिवर्तनाच्या असा कार्यक्रम कणकवलीत आयोजित करण्यात आला आहे. सम्यक साहित्य संसद सिंधुदुर्ग यांच्या वतीने होणारा हा बहारदार कार्यक्रम येत्या 3 ऑगस्ट 2025 रोजी सकाळी 10.30 ते दुपारी 1.30 या वेळेत एच.पी. सी. एल. सभागृह कणकवली कॉलेज येथे पार पडणार आहे. या कार्यक्रमात मराठी साहित्य व नाट्य क्षेत्रातील मान्यवर कवी ,लेखक,अभिनेते आणि गायक सहभागी होणार असून सामाजीक परिवर्तनाची संकल्पना कवितांमधून प्रभावीपणे सादर केली जाणार आहे.

कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान सम्यक साहित्य संसदे चे अध्यक्ष तथा प्रसंवाद चे संपादक इंजि.अनिल जाधव हे भूषविणार असून उद्घाटक जेष्ठ कवी कादंबरीकार व लोककला अभ्यासक डॉ. महेश केळुसकर यांच्या हस्ते होणार आहे. प्रमुख पाहुणे म्हणुन शिक्षण प्रसारक मंडळ कणकवली च्या अध्यक्षा डॉ. राजश्री साळुंखे व साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त कादंबरीकार कवी प्रा.प्रवीण बांदेकर हे उपस्थित राहणार आहेत. कार्यक्रमात सहभागी होणार्‍या प्रमुख कवी आणि मराठी भाषा अभ्यासकांमध्ये वीरधवल परब,सुनील हेतकर,डॉ. अनिल धाकु कांबळी ,डॉ राजेंद्र मुंबरकर, डॉ. सोमनाथ कदम,विठ्ठल कदम, डॉ. नामदेव गवळी ,प्रा. मोहन कुंभार ,कल्पना मलये ,प्रा.पूनम गायकवाड,नीलम यादव,स्नेहा कदम यांचा समावेश आहे. कवितांचे अभिवाचन व सादरीकरण अभय खडपकर,राजेंद्र कदम, सचिन वळुंज ,नीलेश पवार,सुदिन तांबे,प्रा.सीमा हडकर, विद्याधर तांबे, श्रेयस शिंदे, रुपाली कदम,शैलेश तांबे,सुषमा हरकुळकर, अनुष्का तांबे या नाट्यकलावंत व अभिनेते संवादकाच्या आवाजात रंगणार आहे. त्यासोबतच कार्यक्रमाचे विशेष आकर्षण म्हणजे पाऊसगाण्यांची संगीतमय मैफल संदेश रावले, महेश काणेकर, संदेश तांबे, राकेश मीठबावकर,अमृता घाडी आणि सहगायक यांच्या सादरीकरणात ही मैफल सादर होणार आहे यासोबतच निमंत्रित कवी -कवयित्री यांचे काव्य संमेलन ही रंगणार आहे या सामाजीक परिवर्तनाच्या आविष्काराची आणि साहित्य नाट्य व संगीत यांची त्रिसंधी साधणाऱ्या या कार्यक्रमासाठी सर्व रसिकांनी उपस्थित राहावे असे आवाहन कोषाध्यक्ष संध्या तांबे,सहकार्यवाह मधुकर मातोंडकर,उपाध्यक्ष प्राचार्य सिद्धार्थ तांबे ,कार्यवाह राजेश कदम व माजी अध्यक्ष अरुण नाईक यांनी केले आहे.