30 जुलै रोजी शिरगाव येथे
रत्नागिरी, दि.28 : जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या वतीने जिल्हयातील बेरोजगार उमेदवारांना विविध क्षेत्रात रोजगाराच्या संधी उपलब्ध करुन देण्याच्या दृष्टिने पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्याचे 30 जुलै सकाळी 11 वाजता महर्षि कर्वे स्त्री शिक्षण संस्थेचे श्रीमती यशोदा यशवंत पवार सभागृह, साखरतर रोड शिरगाव येथे आयोजित करण्यात आला आहे.
जिल्ह्यातील सर्व उमेदवारांनी रोजगार संधीचा लाभ घेण्यासाठी त्यांची नोंदणी विभागाच्या www.mahaswayam.gov.in पोर्टलवर करावी. नोंदणीकृत असलेल्या सर्व उमेदवारांनी त्यांचे प्रोफाईल अद्ययावत करावे. नोंदणी केलल्या उमेदवारांनी त्यांच्याकडील युझर आयडी व पासवर्डच्या सहाय्याने 30 जुलै रोजीच्या पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळावामध्ये ऑनलाईन अप्लाय करुन रोजगार मेळाव्याच्या दिवशी मुलाखतीकरिता त्यांचे बायोडाटा व इतर आवश्यक शैक्षणिक कागदपत्रांच्या प्रतींसह प्रत्यक्ष उपस्थित राहावे.
रोजगार मेळाव्यामध्ये सहभागी होण्यासाठी आपली नोंदणी नसल्यास कृपया जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र या कार्यालयाकडे त्वरित संपर्क साधून नोंदणी करावी व रोजगार मेळाव्यात सहभागी होऊन रोजगार संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या सहायक आयुक्त इनुजा शेख यांनी केले आहे.










