मसुरे | झुंजार पेडणेकर :प पु गावडेकाका महाराज यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या श्री स्वामी समर्थ मठ, मसदे-वडाचापाट येथे सोमवार ११ ऑगस्टला विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी ८ वाजता सामूहिक सत्यनारायण महापूजा, ११ वाजता महाआरती, दुपारी १२ वाजता गावडे काका महाराज यांचे आगमन आणि आध्यात्मिक मार्गदर्शन, १ वाजता महाप्रसाद-अन्नदान, २.३० वाजता श्री देव वेताळ मुंजेश्वर प्रासादिक भजन मंडळ, पोईप बुवा ओंकार येरम यांचे भजन, सायंकाळी ५ वाजता भजने, ७ वाजता दैनंदिन आरती आदी कार्यक्रम होणार आहेत. यावेळी उपस्थित राहण्याचे आवाहन सेवेकऱ्यांतर्फे करण्यात आले आहे. कार्यक्रमाच्या अधिक माहितीसाठी ९४२३५३८४१८ यांच्याशी संपर्क साधावा.











