देवगडात कल्याण मटका जुगारावर एलसीबीची कारवाई; दोघांवर गुन्हा दाखल

देवगड, दि. 26 जून: स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने (एलसीबी) देवगड तालुक्यात कल्याण मटका जुगारावर कारवाई करत दोघांविरुद्ध महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

ही कारवाई शुक्रवारी सायंकाळी 5.45 वाजण्याच्या सुमारास तळेबाजार बसस्थानकाजवळ करण्यात आली. कारवाईदरम्यान दत्तात्रय शंकर गोरुले (वय 30, रा. वरेरी, डोंगरेकरवाडी, ता. देवगड) आणि रमाकांत यशवंत थोटम (वय 40, रा. वरेरी, डोंगरेकरवाडी, ता. देवगड) यांना ताब्यात घेण्यात आले.

आरोपींकडून 5 हजार 280 रुपये रोख रक्कम तसेच कल्याण मटका जुगाराचे साहित्य जप्त करण्यात आले आहे. या प्रकरणी महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक अधिनियमाच्या कलम 12(अ) अन्वये देवगड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही कारवाई सिंधुदुर्गचे पोलीस अधीक्षक मोहन दहिकर व अप्पर पोलीस अधीक्षक नयोमी साटम यांच्या सूचनेनुसार, पोलीस निरीक्षक प्रवीण कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली पोहेकॉ गंगावणे, तवटे व देसाई यांच्या पथकाने केली.