सफाई कामगारांना मारहाण, गुन्हा दाखल

देवगड(प्रतिनिधी)
आपल्या घराच्या परिसरात कामगारांना घेऊन साफसफाई ,करून गवत काढीत असताना जमीन माझी आहे गवत काढायचे नाही अशी कामगारांना दमदाटी केली व हातातील लाकडी तुकडे डोक्यात मारून दुखापत केली अशी फिर्याद कुवळे बौद्धवाडी येथील आशिष अशोक कदम (३८)यांनी या घटनेतील संशयित आरोपी जयेंद्र पद्माकर कदम(३७) याचे विरोधात देवगड पोलीस स्थानकात दिली आहे. सदरची घटना ३० जुलै दुपारी ३.३० वाजता कुवळे बौद्ध वाडी येथे घडली. या घटने संदर्भात देवगड पोलीस स्थानकात बीएन एस ११८(१) ३५१(२)(३) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास पोलीस हवालदार महेंद्र महाडिक करीत आहेत.