लांजा (प्रतिनिधी): महाराष्ट्र राज्य केंद्रप्रमुख संघ या संघटनेच्या रत्नागिरी जिल्हा सरचिटणीस पदी लांजा तालुक्यातील खावडी केंद्राचे केंद्रप्रमुख उमेश केसरकर यांची निवड करण्यात आली आहे.
गेली अनेक वर्षे लांजा तालुक्यामध्ये प्राथमिक शिक्षक म्हणून काम करणाऱ्या उमेश केसरकर यांची नुकतीच केंद्रप्रमुख पदी नियुक्ती करण्यात आली होती. सध्या ते खावडी केंद्राचे केंद्रप्रमुख म्हणून काम पाहत आहेत. संघटनेच्या नुकत्याच पार पडलेल्या सर्व तालुका अध्यक्ष व पदाधिकारी यांच्या सभेत झालेल्या निर्णयानुसार उमेश केसरकर यांची संघटनेच्या रत्नागिरी जिल्हा सरचिटणीस पदी नियुक्ती करण्यात आली आहे. या निवडीचे पत्र त्यांना संघटनेचे जिल्हाध्यक्ष सुनील जाधव व राज्य नेते बाबाजी शिर्के यांनी दिले आहे .
दरम्यान केंद्रप्रमुख संघाच्या वाढीसाठी आणि केंद्रप्रमुखांच्या प्रश्नासंबंधी आपण तन-मन-धनाने सहकार्य करावे.. वेळोवेळी केंद्रप्रमुखांच्या व शैक्षणिक प्रश्न संदर्भात सभासदांशी चर्चा करून मीटिंगाचे आयोजन करावे आणि वरिष्ठ पातळीवर प्रश्न सोडवण्यास सातत्य ठेवावे असे या पत्रात नमूद करण्यात आले आहे.
दरम्यान महाराष्ट्र राज्य केंद्रप्रमुख संघाच्या जिल्हा सरचिटणीस पदी निवड झाल्याबद्दल उमेश केसरकर यांच्यावर तालुक्याच्या शिक्षण क्षेत्रातून अभिनंदनचा वर्षाव होत आहे
Home महत्वाच्या बातम्या महाराष्ट्र राज्य केंद्रप्रमुख संघ रत्नागिरी च्या जिल्हा सरचिटणीसपदी उमेश केसरकर यांची निवड













