कुडाळ येथील राजेंद्र तेरसे यांचा राष्ट्रीय स्तरावर उपविजेतेपदाने गौरव

सुझुकी मोटरसायकल इंडिया च्या देशभरातील डिलर मधून श्री विनायक व्हिल्स प्रा. लि. याचा गौरव

स्वप्निल कदम -कुडाळ :पवई, मुंबई येथे झालेल्या सुझुकी मोटरसायकल इंडिया च्या डिलर  कॉन्फरन्समध्ये, वित्तीय वर्ष 2024-25 मध्ये सिंधुदुर्ग कुडाळ मधील श्री विनायक  व्हिल्स प्रा.लि. ने  जगातील टॉप बँड सुझुकी मोटरसायकल इंडिया च्या देशभरातील डिलर मधून राष्ट्रीय स्तरावर ‘Highest Vehicle Accessories Sale Per Vehicle’ मध्ये उपविजेतेपद पटकावून वर्चस्व गाजवले. सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये १२५सीसी स्कूटर सेगमेंट मध्ये सध्याच्या घडीला अग्रेसर म्हणून या डीलरशिपला पाहिले जाते.

ही डीलर कॉन्फरन्स नुकतीच पवई स्थित दी वेस्टिन हॉटेल, मुंबई येथे आयोजित करण्यात आली होती. त्यामध्ये श्री विनायक व्हिल्स प्रा.लि. सुझुकी, कुडाळ या डीलरने आपले वर्चस्व सिद्ध केले.श्री विनायक व्हिल्स प्रा. लि. चे मॅनेजिंग डायरेक्टर, राजेंद्र तेरसे यांना सुझुकी इंडिया चे मॅनेजिंग डायरेक्टर श्री केनिची उमेडा सान यांनी पुरस्कार देऊन सन्मानित केले.  या कार्यक्रमास  सुझुकी इंडिया चे व्हॉईस प्रेसिडेंट श्री दीपक मुथरेजा सांन, देवाशीष हंडा सान,व्यवस्थापकीय संचालक मित्सुमोटो वटाबे हरीकृष्ना सान  उपस्थित ,होते ,

यावेळी बोलताना श्री तेरसे म्हणाले,ग्राहकांचे समाधान हेच श्री विनायक व्हिल्स प्रा.लि. व सुझुकी मोटरसायकल इंडिया प्रा.लि. यांचे ध्येय आहे.तसेच सुझुकी मोटर सायकल इंडिया प्रा लिमी.(SMIPL)सुझुकी मोटर सायकल जपान प्रा लिमिटेड यांच्या वतीने हा

पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. या सर्व यशात सुझुकीचे पॅरामीटर्स, प्रशिक्षित कर्मचारी, प्रशिक्षण, त्यांनी मिळविलेले सर्टिफिकेट्स, होलसेल ॲक्सेसरीज,  सेल्स व सर्विस पॅरामीटर्समध्ये सातत्य ठेवल्यामुळे हे यश मिळवणे शक्य झाले, असे  सांगितले.

सुझुकी मोटरसायकल इंडिया च्या डिलर  कॉन्फरन्समध्ये, कुडाळ मधील श्री विनायक  व्हिल्स प्रा.लि. ने  जगातील टॉप बँड सुझुकी मोटरसायकल इंडिया च्या देशभरातील डिलर मधून राष्ट्रीय स्तरावर उपविजेतेपदाने गौरविण्यात आले. याबाबत जिल्हाभरातून त्यांचे अभिनंदन केले जात आहे.