वेंगुर्ले : प्रतिनिधी
गजानन विद्यालय पाट या शाळेच्या नवीन इमारतीच्या बांधकामाचा भव्य भूमिपूजन सोहळा कुडाळ चे माजी पंचायत समिती सभापती संजय वेंगुर्लेकर यांच्या हस्ते मोठ्या उत्साहात पार पडला. यावेळी विविध क्षेत्रांतील मान्यवर, लोकप्रतिनिधी, पालक, ग्रामस्थ आणि माजी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या भूमिपूजन सोहळ्याला भाऊ देसाई, चंद्रकांत तेली गुरुजी, जिल्हा परिषद सदस्या अर्चना पाटील, पंचायत समिती सदस्या सौ. प्रियांका समीर जळवी, शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष आबा जळवी, उपाध्यक्षा सौ. निकी परब, तसेच शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. सामंत मॅडम यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी व्यासपीठावर संजय वेंगुर्लेकर, जिल्हा परिषद सदस्या आरती पाटील, पंचायत समिती सदस्या सौ. प्रियांका जळवी, चंद्रकांत तेली गुरुजी, भाऊ देसाई गुरुजी, सौ. पारकर मॅडम, पाट ग्रामपंचायत सरपंच सौ. साधना परब, उपसरपंच समीर धुरी, ग्रामपंचायत सदस्या सौ. वैष्णवी शेगले, ग्रामपंचायत सदस्य दादा प्रभू, राजन मयेकर सर, सत्यवान ऊर्फ बाबी खोरजुवेकर, नामदेव जळवी, महादेव कोचरेकर, मधुकर गोसावी, तसेच ठेकेदार अक्षय गावडे व चव्हाण आदी मान्यवर उपस्थित होते.
भूमिपूजन सोहळ्यानिमित्त संजय वेंगुर्लेकर, चंद्रकांत तेली गुरुजी यांच्यासह उपस्थित मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले. शाळेच्या नवीन इमारतीच्या उभारणीमुळे विद्यार्थ्यांना अधिक चांगल्या शैक्षणिक सुविधा उपलब्ध होण्यास मदत होणार असून, शाळेच्या प्रगतीच्या दृष्टीने हा महत्त्वपूर्ण टप्पा ठरणार असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.
या सोहळ्याला पालक, ग्रामस्थ आणि माजी विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. उत्साहपूर्ण वातावरणात हा भूमिपूजन सोहळा संपन्न झाला.












