डीबीजेत रंगला ‘जल्लोष तरुणाईचा’ कार्यक्रम

चिपळूण (प्रतिनिधी) : येथील नवकोंकण एज्युकेशन सोसायटीच्या डीबीजे कनिष्ठ महाविद्यालयातील सांस्कृतिक विभागाच्या उद्घाटन सोहळयानिमित्त “जल्लोष तरुणाईचा” कार्यक्रम मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला. संस्थेचे सचिव अतुल चितळे व प्राचार्य डॉ माधव बापट यांच्या हस्ते या कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले.
शैक्षणिक क्षेत्रात अभ्यासाबरोबरच असे सांस्कृतिक कार्यक्रम विद्यार्थ्यांंच्या व्यक्तिमत्त्व विकासासाठी पुरक असतात असे मत प्राचार्य डॉ माधव बापट यांनी व्यक्त केले.सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा.सौ कांचन तटकरे यांनी स्वागतपर मनोगत व्यक्त केले.डीबीजेच्या सांस्कृतिक विभागाला उज्ज्वल परंपरा आहे.ती मोठ्या अभिमानाने पुढे न्यायला हवी अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या. जल्लोष तरुणाईचा या कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी गायन, वादन, नृत्य सादर केली.या मध्ये लावणी, कोळी नृत्य, वेस्टर्न,साऊथ इंडियन, आदिवासी नृत्य, विनोदी नाटीका, वाद्यवादन असा बहारदार कार्यक्रम सादर करून उपस्थितांची मने जिंकली. या कार्यक्रमाला संस्थेचे सचिव श्री अतुल चितळे प्राचार्य डॉ माधव बापट, उपप्राचार्या प्रा.स्नेहल कुलकर्णी, पर्यवेक्षिका डॉ.सुजाता खोत, रजिस्ट्रार विजयेंद्र जाधव, वरिष्ठ व कनिष्ठ महाविद्यालय प्राध्यापक वर्ग आदि मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी सांस्कृतिक विभागप्रमुख प्रा.सौ. कांचन तटकरे, प्रा.सौ.मृण्मयी सोहनी, प्रा.सिद्धी साडविलकर, प्रा.दिशा दाभोळकर, डॉ.माधवी जोशी, प्रा.सौ.अंकिता टाकळे, प्रा.प्रिया जाधव, प्रा. श्रीमती सुचिता दामले, प्रा. सोनाली खर्चे, प्रा. अरुण जाधव, प्रा.विठ्ठल कोकणी, प्रा.प्रदीप वळवी यांनी परिश्रम घेतले, कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.उज्ज्वला कुलकर्णी व प्रा.सौ.तृप्ती यादव यांनी केले तर आभार प्रा.नम्रता माने यांनी मानले.