गुहागर भाजपा तालुका कार्यकारणी जाहीर

सरचिटणिस पदी संतोष सांगळे व सचिन ओक, महिला आघाडी अध्यक्ष प्रांजली कचरेकर यांची नियुक्ती

गुहागर (प्रतिनिधी) गुहागर भारतीय जनता पार्टी तालुका कार्यकारणी माजी आमदार डॉ. विनयजी नातू आणि उत्तर रत्नागिरी जिल्हाध्यक्ष सतिश मोरे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये स्व.डॉ. तात्या नातू यांच्या ३३ व्या पुण्यतिथी या दिनाचे औचित्य साधून जाहीर करण्यात आली.

जाहीर करण्यात आलेल्या कार्यकारणिमध्ये नव्या जुण्या कार्यकर्ताचा समतोल राखत येणाऱ्या पंचायत समिती आणि जिल्हा परिषद निवडणुक उदिष्ट समोर ठेऊन कार्यकर्त्यांना या समितीमध्ये सामावून घेण्यात आले आहे. तालुक्यातील सर्व जातीधर्मांतील व महिला कार्यकर्त्यांना सामावून घेत ६० कार्यकर्त्यांची कार्यकारणी जाहीर करण्यात आली.

यामध्ये सरचिटणिस पदी संतोष शांताराम सांगळे व सचिन मुकुंद ओक, महिला आघाडी अध्यक्ष प्रांजली कचरेकर उपाध्यक्ष पदी सौ. धनश्री घनश्याम मांजरेकर , विनायक सुर्वे, श्रीकांत मोरे, आशिष विचारे, विजय भुवड, संदिप कोंडविलकर, यांची नियुक्ती करण्यात आली. तर चिटणिस पदी राजेंद्र नरवणकर, अंकुश पिळवळकर, सौ. मृदुला नाटेकर, सौ. प्रियांका जाधव, सौ. निता मालप, सौ. रश्मी घाणेकर, कोषाध्यक्ष पदी साईनाथ कळझुणकर, ओबीसी मोर्चा अध्यक्ष विजय मसुरकर, किसान मोर्चा अध्यक्ष सुनिल भेकरे, अल्पसंख्याक अध्यक्ष आसिफ दळवी , सोशल मिडीया अध्यक्ष दिपक मोरे, व्यापारी संयोजक अध्यक्ष महेश जाधव, भटके विमुक्त आघाडी अध्यक्ष सागर भिंगारे, मच्छिमार आघाडी अध्यक्ष विजय बेंदरकर, कायदा आघाडी अध्यक्ष अॅड. मयुर कानसे, बुध्दीजिवी अध्यक्ष रविकिरण वैद्य, सहकार आघाडी अध्यक्ष प्रकाश विर, शिक्षक आघाडी अध्यक्ष विश्वास बेलवलकर, पंचायत राज अध्यक्ष रविद्र अवेरे, जेष्ठ कार्यकर्ता आघाडी अध्यक्ष गजानन वेल्हाळ. अजाती मोर्चा आघाडी संयोजक युवराज कोलंबेकर. तर कार्यकारणी सदस्य पदी उमेश भाटकर, जैनुददीन दाभोळकर, विक्रांत पागडे, सौ. श्वेता साळवी, सौ. पूजा कारेकर, सौ. सायली जाधव, सौ. प्रतिक्षा रोहीहलकर, श्रीमती नेहा वराडकर, श्री. कैलास साळवी, रमेश सुर्वे, अशोक बागकर, सुहास निमकर, प्रकाश मोरे, विलास घाणेकर, संतोष दामले, नितीन कनगुटकर, विपुल नार्वेकर, दिनेश देवळे, यशवंत पालकर, विष्णू विर, सुनिल साळवी, रामदास गिजे, गणपत पागडे, वल्लभ कदम, नरेश पवार, प्रथमेश पाडेकर, इकबाल पंच्छी, विजय गुडेकर, कृष्णा पारदळे, चंद्रकांत म्हसकर, अशोक चिवेळकर, अरुण रहाटे, सौ. वैष्णवी घाडे, सौ. संध्या भोसले, सौ. दिप्ती सांगळे, सौ. प्रतिक्षा बागकर, सौ. प्रणिता साटले, श्रीमती रुही शेटे, सौ. तृप्ती कनगुटकर, सौ. श्रावणी पाटील, सौ. सायली वेद्रे, महेश तोडणकर, कृष्णा गोरिवले. संदिप हळदणकर यांची नियुक्ती करण्यात आली.

यावेळी नवनिर्वाचितांना शुभेच्छा देतांना डॉ. नातू म्हणाले, या कार्यकारणी मध्ये सर्वांना न्याय देता आला नसला तरी आपण सर्वच भारतीय जनता पार्टीचे मनापासुन काम करणारे कार्यकर्ते आहोत. येणाऱ्या पंचायत समिती आणि जिल्हा परिषद निवडणुक उदिष्ट समोर ठेऊन आपल्याया या पुढील काळामध्ये काम करावयाचे आहे. आपण पुर्णपणे ताकदिने या निवडणुकांना सामोरे जाणार आहोत. पक्ष युतीचा काय निर्णय घेईल याची वाट न बघता कामाला लागा. कुणाला काय या पुढे वाटेल याचा विचार करु नका, सगळयांचे गुंतलेले धागे आता आपण बाहेर निघतील त्यांचा तुम्ही विचार करु नका ते माझ्यावर सोडा अशा विश्वास या ठिकाणी त्यांनी व्यक्त केला. तर जिल्हाध्यक्ष सतिश मोरे यांनी या पुढील काळात बदळत्या भाजपाच्या रणनिती प्रमाणे आपण काम करणार आहोत. संघर्षांतूनच आम्ही या पदापर्यंत पोहचलो आहोत. त्यामुळे येवू घातलेल्या निवडणुकांमध्ये आपण ताकदिने उतरणार असल्याचे त्यांनी सांगितले.

तर माजी तालुकाअध्यक्ष निलेश सुर्वे यांनी सर्वांना शुभेच्छा दिल्या आणि तालुकाध्यक्ष अभय भाटकर यांनीही आपल्या मनोगतामध्ये आपण सर्वांना बरोबर घेवून काम करणार असून सर्वांना न्याय देण्याचा प्रयन्न या कार्यकारणीच्या माध्यमातून केला असल्याचे सांगितले. तर माजी पं.स.सभापती लक्ष्मण शिगवण यांनी स्व. तात्या नातूच्या स्मृतींना उजाला दिला. यावेळी व्यासपिठावर दुर्गादेवी देवस्थान अध्यक्ष किरण खरे, गजानन वेल्हाळ, गोपाळ झगडे उपस्थित होते.

फोटो. गुहागर भारतीय जनता पार्टी नवनिर्वाचित कार्यकारणी समवेत डॉ. विनय नातू, जिल्हाअध्यक्ष सतिश मोरे, मा. तालुकाध्यक्ष निलेश सुर्वे, तालुकाध्यक्ष अभय भाटकर.