गटविकास अधिकारी शेखर भिलारे यांनी चौकशीचे आदेश दिले
गुहागर | प्रतिनिधी
महाराष्ट्र शासन बालकांना पोषण आहार शाळांमध्ये पुरवण्याचे काम करतं आहे .मात्र त्याची एक्सपाय डेट पूर्ण होण्याआधीच शासनाच्या ह्या पोषण आहार खिचडीची पॅकेट कचऱ्याच्या ढिगार्यामध्ये आढळून आल्याची घटना घडली होती याची सखोल चौकशी करण्यात यावी अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेना आक्रमक भूमिका घेणार असल्याची माहिती महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उपजिल्हाध्यक्ष श्री विनोदजी जानवळकर यांनी दिली होती. दैनिक प्रहारने हे वृत्त प्रसिद्ध केल्याने गुहागरचे गटविकास अधिकारी शेखर भिलारे यांनी बातमीची दखल घेऊन शुक्रवारी तत्काळ चौकशीचे आदेश दिले होते.
शुक्रवारी त्या विभागाच्या सुपरवायझर यांना यासंबंधी चौकशी करण्याचे आदेश दिले. त्यानंतर आतापर्यंत 53 लाभार्थ्यांची यादी ही प्राप्त झाली असून उर्वरित लाभार्थ्यांची यादी प्राप्त झाल्यानंतर पोषण आहाराची पॅकेट कोणी फेकली याची माहिती उपलब्ध होणार असल्याची माहिती गट विकास अधिकारी भिल्लारे यांनी दिली.
गटविकास अधिकारी शेखर भिलारे यांनी सांगितले की त्या विभागांमध्ये लाभार्थ्यांची मोठी यादी असून येत्या दोन दिवसांमध्ये संपूर्ण अहवाल प्राप्त होईल त्यानंतर हे कृत्य कुणी केले आहे याची आपल्याला माहिती उपलब्ध होईल. गटविकास अधिकारी शेखर भिलारे यांनी घटनास्थळी जाऊन त्या पॅकेट यांची पाहणी केली त्यांच्यासोबत मनसेचे उपजिल्हाध्यक्ष विनोद ची जानवळकर , परविक्षिका, अंगणवाडी सेविका उपस्थित होते.











