तेरवण गावातील डॉ. विजय चव्हाण यांचे निधन

राजापूर (प्रतिनिधी): तालुक्यातील तेरवण गावातील प्रतिष्ठीत ग्रामस्थ डॉ. विजय शिवराम चव्हाण (७८) यांचे मंगळवारी २९ जुलै रोजी अल्पशा आजाराने निधन झाले.
एक शांत संयमी व मितभाषी व्यक्तीमत्व म्हणून ते भू तेरवण परिसरात परिचित होते. आपल्या वैद्यकिय व्यवसायाच्या माध्यमातुन त्यांनी या पंचक्रोशीत सर्वसामान्य गोरगरिब जनतेला चांगली आरोग्य सेवा देण्याचे काम केले.
गेले काही दिवस त्यांची प्रकृती बरी नव्हती, त्यांच्यावर उपचारही सुरू होते. मात्र उपचार सुरू असतानाच त्यांची प्राणज्योत मालावली.
त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुलगे, एक मुलगी, सुन, जावई, नातवंडे, पुतणे असा मोठा परिवार आहे. त्यांच्यावर तेरवण गावात अंत्यसंस्कार करण्यात आले.
फोटो कै. विजय चव्हाण