वैभववाडी खरेदी- विक्री संघाच्या संचालक मंडळावर जिल्हा बँक प्रतिनिधी म्हणून संचालक दिलीप रावराणे यांची निवड

वैभववाडी प्रतिनिधी

वैभववाडी तालुका खरेदी विक्री संघाच्या संचालक मंडळावर जिल्हा बँकेचे प्रतिनिधी म्हणून संचालक दिलीप रावराणे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्या निवडीनंतर जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे, वैभववाडी खरेदी- विक्री संघाचे चेअरमन प्रमोद रावराणे व संचालकांनी अभिनंदन केले.

ज्या खरेदी विक्री संघांना बँक व्यवसायासाठी कर्ज व बँक ग्यारंटी सारख्या सुविधा पुरविते त्या खरेदी संघावर सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे विद्यमान संचालक यांची नियुक्ती करण्यात यावी. याविषयी चर्चा जिल्हा बँक संचालक मंडळाच्या सभेत करण्यात आली होती. वैभववाडी तालुका खरेदी विक्री संघ हा जिल्हा बँकेशी सलग्न आहे. त्यामुळे बँकेचे विद्यमान संचालक दिलीप रावराणे यांची या संघाच्या संचालक मंडळावर जिल्हा प्रतिनिधी म्हणून दिलीप रावराणे यांची निवड करण्यात यावी असे पत्र जिल्हा बँकचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी संघाला दिले आहे. संस्थेचे हित जपणे व संघाचा व्यवहार वाढविण्यासाठी ते बँकेच्या वतीने सहकार्य करणार आहेत. दिलीप रावराणे यांच्या निवडीनंतर संघाचे सभासद, वैभववाडी तालुक्यातील सोसायटी संचालक, सभासद व शेतकरी यांच्याकडून अभिनंदन करण्यात येत आहे.