सोमवारी मतमोजणी
राजापूर | वार्ताहर : येथील राजापूर तालुका कुणबी सहकारी पतपेढीच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी रविवारी तालुक्यात 11 केंद्रावर सरासरी 38 टक्के मतदान झाले आहे. पतसंस्थेच्या आजवरच्या वाटचालीत प्रथमच झालेली निवडणुक आणि शेतीची सुरू असलेली कामे यामुळे मतदारांनी या निवडणुकीकडे पाठ फिरवल्याचे चित्र पाहायला मिळाले.
राजापूर तालुका कुणबी सहकारी पतपेढीच्या 12 जागांसाठी रविवारी मतदान प्रक्रिया पार पडली. 12 जागांसाठी 24 उमेदवार रिंगणात होते. यासाठी एकुण 11 केंद्रावर मतदान घेण्यात आले. त्यामध्ये राजापूर शहरातील राजापूर हायस्कुल केंद्र क्र. 1 येथे 730 पैकी 320, राजापूर केंद्र क्रं. येथे 700 पैकी 273 तर राजापूर केंद्र क्रं. 3 येथे 724 पैकी 274 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. या केंद्रावर एकुण 2154 पैकी 867 मतदारांनी मतदान केले.
तालुक्यातील ग्रामिण भागात सागवे केंद्रावर 735 पैकी 264, नाटे 686 पैकी 214, देवाचे गोठणे 1220 पैकी 338, भू येथे 840 पैकी 308, कोड्ये तफेर् सौंदळ 818 पैकी 374, पाचल केंद्रावर 943 पैकी 454, ओणी केंद्र क्रं. 1 वर 1162 पैकी 446, आडीवरे 860 पैकी 338 एकूण 9408 पैकी 3602 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे.
या निवडणुकीची मततमोजणी सोमवार 26 जून रोजी सकाळी 9 वाजता शहरातील गुजराळी येथील श्रीमंगल कार्यालयात मतमोजणी होणार असल्याची माहिती निवडणुक निणर्य अधिकारी सुधीर कांबळे यांनी दिली आहे.