चिपळूण:– खेड तालुक्यातील साखर माध्यमिक विद्यालयात थोर समाजसुधारक आणि स्वातंत्र्यसैनिक लोकमान्य बाळ गंगाधर टिळक पुण्यतिथी व साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती साजरी करण्यात आली.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक शरदचंद्र जाधव होते.
सुरूवातीस शालेय मंत्रिमंडळातील मुख्यमंत्री कु.विघ्नेश रेवणे,सांस्कृतिक मंत्री प्रचिती राजमाने,सहल मंत्री अर्शद कडवईकर, क्रीडा मंत्री आयुष सावंत,आरोग्य मंत्री वेदीका सुतार, अर्थ मंत्री रिध्दी मोरे,स्वच्छता मंत्री अथर्व शिंदे या विद्यार्थ्यांच्या हस्ते दिप प्रज्वलन व लोकमान्य टिळक व अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला.
कु.मोहीनी हिलम,वैष्णवी शिंदे,प्रणव मोहिते,वेदिका सुतार, प्रचिती राजमाने,सिमरन मोहिते,विघ्नेश रेवणे,संगिता पवार, देवर्षी शिंदे या विद्यार्थ्यांनी तसेच अध्यापक रवींद्र गावकर, प्रभाकर राजमाने,शरदचंद्र जाधव यांनी लोकमान्य टिळक व अण्णाभाऊ साठे यांच्या जीवनकार्याची माहिती मनोगतातून विशद केली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु.मोहिनी हिलम, स्वरा कदम व आभार कु.वैष्णवी शिंदे हिने मानले.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विद्यार्थी,शिक्षक व कर्मचारीवर्ग यांनी विशेष मेहनत घेतली.











