चिपळूण (प्रतिनिधी) : बाळकृष्ण स्टोअर्सचे प्रथितयश व्यापारी तसेच कळवंडे येथील स्टोन क्रशरचे मालक नितीन रमाकांत नलावडे यांचे अल्पशा आजाराने गुरुवार दि. ३ एप्रिल रोजी सायंकाळी निधन झाले. त्यांच्या निधनाने व्यापारी व सामाजिक क्षेत्रात हळहळ व्यक्त होत आहे.
त्यांची अंत्ययात्रा शनिवार दि. ४ एप्रिल रोजी सकाळी ७.३० वाजता महालक्ष्मी नगर, नामदेव मंदिर समोरील राहत्या घरापासून रामतीर्थ स्मशानभूमीपर्यंत निघणार आहे. नितीन नलावडे हे मितभाषी, मनमिळावू आणि समाजाभिमुख व्यक्तिमत्त्व म्हणून परिचित होते. त्यांच्या निधनाने परिसरात शोककळा पसरली आहे.












