परीट समाज संघटनेचे माजी सल्लागार मधुकर मोरजकर यांचं निधन

सावंतवाडी : सावंतवाडी शहरातील सालईवाडा येथील ज्येष्ठ नागरिक, तसेच ‘अमर लॉन्ड्री’चे मालक मधुकर मुकुंद मोरजकर (वय ८६) यांचं आज हृदयविकाराच्या झटक्यानं निधन झालं. त्यांच्या निधनामुळे शहरात हळहळ व्यक्त होत आहे. मधुकर मोरजकर हे परीट समाज संघटनेचे माजी सल्लागार म्हणूनही कार्यरत होते. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुलगे, मुलगी, भाऊ, आणि बहीण असा मोठा परिवार आहे. अभिनव फाउंडेशनचे खजिनदार जितेंद्र मोरजकर यांचे ते वडील होत. मोरजकर यांच्या पार्थिवावर उद्या, सोमवारी सकाळी १० वाजता सावंतवाडीतील उभा बाजार येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांच्या निधनानं सावंतवाडीच्या सामाजिक आणि व्यावसायिक क्षेत्राचं मोठं नुकसान झालं आहे.