प्रधानमंत्री पीक विमा योजना : बिगर कर्जदार शेतकऱ्यांसाठी १४ ऑगस्ट आणि कर्जदारांसाठी ३१ ऑगस्टपर्यंत मुदतवाढ

रत्नागिरी | प्रतिनिधी

शेतकऱ्यांना नैसर्गिक आपत्तीमुळे होणाऱ्या पिकांच्या नुकसानीपासून आर्थिक संरक्षण मिळावे यासाठी प्रधानमंत्री पीक विमा योजना (PMFBY) अंतर्गत खरीप हंगाम २०२५साठी अर्ज करण्याची मुदत वाढवण्यात आली आहे.

बिगर कर्जदार शेतकऱ्यांसाठी : १४ ऑगस्ट २०२५ पर्यंत
कर्जदार शेतकऱ्यांसाठी : ३१ ऑगस्ट २०२५ पर्यंत

हा निर्णय जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शिवकुमार सदाफुले यांनी जाहीर केला असून, अधिकाधिक शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

योजनेची वैशिष्ट्ये:

* अर्जासाठी AGRISTACK शेतकरी ओळख क्रमांक अनिवार्य
* ई-पीक पाहणी अंतर्गत पिकांची नोंदणी बंधनकारक
* रत्नागिरी जिल्ह्यातील ८३ महसूल मंडळांमध्ये भात व नाचणी पिकांसाठी योजना लागू
* कर्जदार व बिगर कर्जदार शेतकरी, तसेच कुळाने किंवा भाडेपट्ट्यावर शेती करणारे शेतकरी पात्र (नोंदणीकृत भाडेकरार आवश्यक)

विमा हप्ता:
* भातासाठी : ₹457.50
* नाचणीसाठी: ₹87.50
* विमा हप्ता: फक्त २% (जोखीमस्तर: ७०%)

अर्ज करताना आवश्यक कागदपत्रे:
* सातबारा उतारा
* आधार कार्ड
* बँक पासबुक
* पीक पेरणीचे स्वयं घोषणापत्र
* हप्ता भरल्यानंतर मिळणारी पोहोच पावती जपून ठेवावी

इतर माहिती:

* पीककर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांना योजना बंधनकारक नाही, मात्र सहभागी न होण्यास इच्छुक असल्यास, अंतिम दिनांकानंतर ७ दिवसांच्या आत बँकेला लेखी माहिती द्यावी
* विमा घेतलेल्या पिकाची आणि ई-पीक पाहणीत नोंदवलेल्या पिकाची माहिती एकसारखी असणे आवश्यक, तफावत आढळल्यास ई-पीक पाहणीतील माहिती ग्राह्य धरली जाईल.
* नुकसान भरपाई हंगामअखेर, पीक कापणी प्रयोग व तांत्रिक उत्पादनाच्या तुलनेत घट गृहीत धरून दिली जाईल.

अर्ज कसा करावा?
* कॉमन सर्विस सेंटर (CSC) किंवा आपले सरकार केंद्र यांच्यामार्फत
* अधिक माहितीसाठी: [www.pmfby.gov.in]
* विमा कंपनी: भारतीय कृषी विमा कंपनी, मुंबई

शेतकऱ्यांनी ही संधी साधून आपली पिके विम्याखाली आणावीत, जेणेकरून अनपेक्षित नैसर्गिक संकटांमध्ये त्यांना आधार मिळू शकेल.