चिपळूण (प्रतिनिधी)-शहरामध्ये महामार्गावर शालोम हॉटेल समोर ट्रक पलटी झाला.सुदैवाने जीवित हानी टळली.रहदारीच्या मार्गावर शहरातील नागरिक मोठ्या स्वरूपामध्ये येजा करीत असताना अशा प्रकारचा गलथानपणा जीवावर बेतू शकतो.मात्र याकडे संबंधित प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याने नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. अशा प्रकारच्या घटना वारंवार शहरांमध्ये घडत असतील तर नागरिकांनी जीव मुठीत घेऊन प्रवास करण्याची वेळ आली आहे. अशा संतप्त प्रतिक्रिया देखील येथील नागरिकांनी व्यक्त केल्या आहेत.











