विद्यमान सहकार पॅनेलची बाजी, सर्वच्या सर्व जागा जिंकत घडविला इतिहास

राजापूर तालुका कुणबी सह. पतपेढी निवडणुक

राजापूर | वार्ताहर : येथील राजापूर तालुका कुणबी सहकारी पतपेढीच्या इतिहासात प्रथमच झालेल्या पंचवार्षिक निवडणूकीत सहकार पॅनलने 13 पैकी 13 जागा जिंकत एकहाती वर्चस्व प्रस्थापित केले आहे. मात्र या निवडणुकीत परिवर्तनचा नारा देत निवडणुकीत उतरलेल्या कुणबी सहकार पॅनेलला एकाही जागेवर विजय मिळवता आलेला नाही. त्यामुळे स•ाासदांनी पुन्हा एकदा विदयमान अध्यक्ष प्रकाश मांडवकर यांच्या नेतृत्वाखालील पॅनेलवर विश्वास दाखवत पतपेढीच्या कार•ााराची सुत्रे सुपुर्द केली आहेत.

राजापूर तालुका कुणबी सहकारी पतपेढीच्या सन 2023-24 ते 2028-29 या कालावधीसाठी 13 जागांसाठी निवडणुक जाहीर झाली होती. पैकी तालुक्याबाहेरील सर्वसाधारण मतदार संघातील जागा यापुर्वीच विद्यमान सहकार पॅनेलने जिंकली होती. तर 12 जागांसाठी रविवारी मतदान प्रकिया पार पडली होती. या पंचवार्षिक निवडणुकीची मतमोजणी सोमवारी शहरातील श्री मंगल कार्यालयात सकाळी सुरू करण्यात आली. सायंकाळी 5 वाजता अंतीम निकाल जाहीर करण्यात आला.

एकाच वेळी ११ मतदान केंद्रांवर मतमोजणी करण्यात आली. महिला राखीव मतदार संघातून मानसी दिवटे १९७३, अमृता शिवगण १९१४ विजयी झाल्या त्यांनी वैष्णवी कुळे १२७९, उन्नती वाघरे ११७१ यांचा परा•ाव केला. या मतदार संघात ३२२ मते अवैध ठरली.

 

इतर मागास प्रवर्ग मतदार संघात झालेल्या दुहेरी लढतीत प्रकाश लोगळे २०१५ यानी दिपक बेंदे्र १३३२ यांचा ६८३ मतांनी परा•ाव केला. या मतदार संघात २६० मते अवैध ठरली.

अनुसुचित जाती जमाती राखीव मतदार संघात अनंत मोरवस्कर २०४८ यांनी रविंद्र पवार १३१० यांचा ७३८ मतांनी परा•ाव केला. या मतदार संघात २४९ मते अवैध ठरली.

•ाटक्या विमुक्त जाती जमाती राखीव मतदार संघातून धनेश कोकरे २०३३ यांनी दशरथ कविस्कर १३१४ यांचा ७१९ मतांनी परा•ाव केला. या मतदार संघात २६० मते अवैध ठरली.

तर सर्वसाधारण मतदार संघात झालेल्या चुरशीच्या लढतीत प्रकाश मांडवकर १९२६, सुरेश ऐनारकर १९२२, बाळकृष्ण तांबे १८९४, सोनू तिर्लोटकर १८९१, अविनाश नवाळे १८९१, विदयाधर गोठणकर १८७७ आणि रमेश सुद १८५५ हे विजयी झाले. या मतदार संघात काशिनाथ गोर्ले १२१९, चंद्रकांत जानस्कर १२३६, संतोष तांबे १२१९, सु•ााष नवाळे १२७३, हनुमंत पाष्टे ११६५, वासुदेव मासये ११६२, शांताराम शेडेकर ११७१ यांना परा•ाव पत्करावा लागला. या मतदार संघात ३०१ मते अवैध ठरली.

प्रथमच या निवडणुकीत विद्यमान सहकार पॅनलला परिवर्तन पॅनलने आव्हान दिल्याने चुरस निर्माण झाली होती. मात्र विदयमान अध्यक्ष प्रकाश मांडवकर यांच्या नेतृत्वाखालील सहकार पॅनलने १३ पैकी १३ जागा जिंकत आपले वर्चस्व कायम ठेवले आहे.

या निवडणूकीत मतपत्रीकेद्वारे मतदान झाले होते. त्यामुळे मतदारांचा काहीसा गोंधळ उडाला. सर्व मतदार संघातील १३९२ मते बाद ठरली आहेत. त्याचा फटका सर्वच उमेदवारांना बसला आहे.

कोणत्याही प्रकारचा गोंधळ गडबड न होता अत्यंत नियोजन बध्द मतमोजणी प्रक्रिया पार पडली. त्यासाठी निवडणूक अधिकारी सुधीर कांबळे, सहायक निबंधक राजापूर अविनाश इंगळे तसेच निबंधक कार्यालय राजापूरचे राहुल खडसे, संतोष पाटील, प्रसाद वडिवरेकर, विनोद गुरव, पळसमकर, अशोक गोसावी यांसह राजापूर, लांजा, रत्नागिरी तालुक्यातील विकास सोसायटयांचे सचिव, पतसंस्थेचे सचिव व कर्मचारी यांनी विशेष मेहनत घेतली.

 

आपण केलेल्या कामाचे चीज झाले-प्रकाश मांडवकर

कुणबी समाजातील समाज धुरीणांनी जो उद्देश घेवून ही संस्था स्थापन केली. ती संस्था त्यांच्या उद्देशाला कोणताही तडा जावू न देता पुढे नेण्याचा आपण आपल्या संपूर्ण कारकिर्दीत प्रामाणिक प्रयत्न केला. त्याचीच पोच पावती आपणाला या निकालाने समाज बांधव व स•ाासदांनी दिलेली आहे. त्यांचा विश्वास सार्थ ठरविण्याचा प्रयत्न पुढच्या काळात करून पतसंस्थेला अधीकाधीक पुढे नेण्याचा प्रयत्न करणार असल्याची प्रतिक्रिया या निकालानंतर सहकार पॅनेलचे प्रमुख आणि विद्यमान अध्यक्ष प्रकाश मांडवकर यांनी दिली आहे.