रत्नागिरी | दुर्गेश पिलणकर
बुधवार दुपारी रत्नागिरी शहराजवळील भाट्ये परिसरात दोन दुचाकींचा भीषण अपघात झाला आहे.
बुलेट (MH08 AW 4050 व होंडा एक्टिवा (MH08 AZ 1824) या दुचाकींमध्ये जोरदार धडक झाली.
बुलेट चालवणारा चालक गंभीर जखमी,
एक्टिवा वरील दोन तरुणींनाही दुखापत,
अपघातग्रस्तांना जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
पावसच्या दिशेने निघालेला बुलेटस्वार भाट्ये पोलीस चौकीजवळ आला असता, रत्नागिरीकडे वळणाऱ्या दोन तरुणींच्या एक्टिवावर त्याची जोरदार धडक बसली.
अपघात स्थळी रक्ताचा सडा, भीषण दृश्य!
पोलिसांनी पंचनामा करून तपास सुरू केला आहे.








