आमदार निलेश राणे यांच्या सूचनेनंतर नारळी पौर्णिमेनिमित्त कुडाळ शहरात पुन्हा एकदा होणार रिक्षा रॅली

रिक्षाव्यवसायिकांमध्ये व्यक्त केले जात आहे समाधान

कुडाळ प्रतिनिधी
कुडाळ शहरात होणारे नारळी पौर्णिमेनिमित्त रिक्षा रॅली आमदार निलेश राणे यांच्या सूचनेमुळे पुन्हा एकदा सुरू होणार आहे ही रॅली सुरू होत असल्यामुळे रिक्षा व्यवसायिकांकडून समाधान व्यक्त केले जात आहे.
कुडाळ शहरामध्ये दरवर्षी नारळी पौर्णिमेला रिक्षा व्यावसायिक रॅली काढून नदीला नारळ अर्पण करतात यामध्ये राजकीय पक्षांच्या रिक्षांची रॅली सुद्धा असते. मात्र गेल्या वर्षी वाद निर्माण झाल्यामुळे यावर्षी पोलिसांनी रिक्षा व्यवसायिकांची बैठक घेऊन एक रिक्षा नदीपर्यंत घेऊन जावी आणि नारळ पण करून यावे अशी सूचना दिली होती दरम्यान रिक्षाव्यवसायिकांनी व शिवसेनेचे तालुकाप्रमुख विनायक राणे यांनी ही बाब आमदार निलेश राणे यांच्या निदर्शनास आल्यानंतर दरवर्षीप्रमाणे रिक्षा व्यवसायिकांची रॅली झाली पाहिजे अशा सूचना पोलिसांना दिल्यानंतर पोलिसांनी आपला निर्णय बदलून रिक्षाव्यवसायिकांना वेळेचे बंधन टाकून रिक्षा रॅलीला परवानगी दिली त्यामुळे यावर्षी सुद्धा रिक्षा रॅली होणार आहे.