रत्नागिरी जिल्ह्यात पावसाने दडी मारली

रत्नागिरी: शुक्रवार, दिनांक ०८ ऑगस्ट २०२५ रोजी रत्नागिरी जिल्ह्यात पावसाने पुन्हा एकदा दडी मारल्याचे दिसून आले आहे. जिल्ह्याचा आजचा सरासरी पाऊस केवळ २.३९ मिमी इतका नोंदवला गेला असून, पावसाचे प्रमाण अत्यंत कमी असल्याने शेतकरी आणि नागरिक चिंतेत आहेत.

आज जिल्ह्यामध्ये सर्वाधिक पाऊस गुहागर तालुक्यात ६.८० मिमी इतका नोंदवला गेला, तर उर्वरित तालुक्यांमध्ये पावसाचे प्रमाण नगण्य होते. मंडणगड तालुक्यात तर पावसाची नोंद शून्य मिमी झाली. खेड तालुक्यात १.७१ मिमी, दापोलीमध्ये ३.२८ मिमी, चिपळूणमध्ये १.५६ मिमी, संगमेश्वरमध्ये २.२५ मिमी, रत्नागिरीमध्ये १.२२ मिमी, लांजामध्ये २.६० मिमी आणि राजापूरमध्ये २.१२ मिमी इतका पाऊस झाला.
पावसाचे प्रमाण कमी असल्याने शेती कामांवर परिणाम होण्याची शक्यता आहे.