विद्यार्थ्यांनी दोन सुवर्ण व एक रौप्य पदकाची कमाई करत स्पर्धेत मारली बाजी
मंडणगड : प्रतिनिधी, – जिल्हा अजिंक्यपद तायक्वांडो स्पर्धा सन 2025 या जिल्हास्तरीय स्पर्धेत मंडणगड शहरातील राजीव गांधी इंग्लिश मेडियम स्कूलचे विद्यार्थी आपल्या नेत्रदीपक कामगिरीने सुवर्ण, रौप्य पदकाचे मानकरी ठरले आहेत. यामध्ये ७ वर्षाखालील गटात मुलींमध्ये आराध्या पवार व मुलांच्या गटामध्ये जय मोरे यांनी सुवर्ण तर स्वस्तिक पवार याने रोप्य पदकावर बाजी मारली. आपल्या विद्यार्थ्यांच्या या यशाबाबत प्रशालेच्या वतीने त्यांचे अभिनंदन करत कौतुक करण्यात आले.
रत्नागिरी जिल्हा तायक्वांडो स्पोर्ट्स असोसिएशन अंतर्गत शहानुर चिपळूण तालुका तायकंदो अकॅडमी यांच्या सहकार्याने चिपळूण येथे नुकतीच 25 वी जिल्हा अजिंक्यपद तायक्वांडो स्पर्धा पार पडली. या स्पर्धेत राजीव गांधी इंग्लिश मेडियम स्कूलच्या या विद्यार्थ्यांनी कौतुकास्पद भरारी घेतली. विद्यार्थ्यांच्या या यशाबाबत राजीव गांधी इंग्लिश मीडियम स्कूलचे चेअरमन संतोष मांढरे, मंडणगड तालुका विकास मंडळ संस्थेचे सरचिटणीस अँड.विनोद दळवी, सरचिटणीस अँड. अभिजित गांधी, संस्थेचे सर्व संचालक, मुख्याध्यापक महेंद्र महाजन, मुख्याध्यापक श्री. शेडगे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर हायस्कूलचे मुख्याध्यापक आबासाहेब हुलगे, उपमुख्याध्यापक अर्जुन हुल्लोळी यांच्यासह प्रशालेचे सर्व शिक्षक, शिक्षिका व कर्मचारी यांनी या खेळाडूंचे अभिनंदन केले.
हे तीनही खेळाडू मंडणगड तायक्वांडो अकॅडमीमध्ये या खेळाचे प्रशिक्षण घेत आहेत. रत्नागिरी जिल्हा तायक्वांडो स्पोर्टस असोसिएशनचे उपाध्यक्ष विश्वदास लोखंडे, प्रशिक्षिका काजल लोखंडे, मंडणगड तालुका तायकांडो अकॅडमी अध्यक्ष प्रशांत सुर्वे, ॲड. तेजकुमार लोखंडे, क्रीडाशिक्षक संजय अवेरे, गौतम माने व प्रणव जाधव यांचे उत्तम मार्गदर्शन लाभले.











